Tarun Bharat

माजी विधानसभा अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी आज दिल्ली येथे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शीला दिक्षीत यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होण्याबरोबरच शास्त्री यांनी 2008 आणि 2013 या काळात दिल्ली विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले. ते दोन वेळा दिल्लीतील मालवीयनगर विधानसभा आणि मेहरौली विधानसभेच्या जागेवर एक वेळा आमदार राहिले आहेत.

शास्त्री यांना 2020 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पक्षातील नेत्यांवर तिकीट विक्रीचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी निवडणुकीपूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. आता जवळपास वर्षभरानंतर योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.

Related Stories

न्यूझीलंड देश झाला कोरोनामुक्त!

Rohan_P

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे अशक्य : WHO

datta jadhav

रिक्षातला बगीचा

Patil_p

26 एप्रिलपासून सीबीएसई 10वी, 12वी टर्म-2 परीक्षा

Patil_p

बुलेटवरून हिंडणारे वृद्ध दांपत्य

Patil_p

भारतीय नौदलाचे 50 वे विजय वर्ष

Patil_p
error: Content is protected !!