Tarun Bharat

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे विधी पंडित पदवीने सन्मानित


मुंबई \ ऑनलाईन टीम

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना विधी पंडित पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभात न्या. शरद बोबडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शरद बोबडे यांनी मानद पदवीचा स्वीकार केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या १०८ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.



यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांचे दीक्षांत भाषण झाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉ.संजय दुधे व कुलसचिव डॉ राजू हिवसे उपस्थित होते.

Related Stories

राधानगरी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Archana Banage

देशात 86,052 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 58 लाखांवर

datta jadhav

बाळासाहेबाच्या स्मारकामध्ये तोतया मुख्यमंत्र्यांना स्थान नाही- उद्धव ठाकरे

Abhijeet Khandekar

”पंतप्रधान मोदींसह त्यांच्या साथीदारांनी हजारो किलोमीटर भूप्रदेश चीनला दिला”

Archana Banage

कल्याणगड डोंगर परिसरात बिबटय़ांचा वावर

Patil_p

पुणे विभागातील 87,736 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar