Tarun Bharat

माजी हॉकीपटू बलवीर सिंग यांची प्रकृती चिंताजनक

वृत्तसंस्था/ चंदीगड

भारताचे माजी ऑलिंपिक हॉकीपटू 96 वर्षीय बलवीर सिंग सिनियर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियानी केली.

बलवीर सिंग सिनियर यांना प्रारंभी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना सध्या येथील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत कन्या सुशबीर आणि नातू कबीर देखभाल घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास जाणवत होता. बलवीर सिंग सिनियर यांनी आपल्या हॉकी कारकीर्दीत भारताला तीनवेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. शनिवारच्या तुलनेत बलवीर सिंग सिनियर यांच्या प्रकृतीमध्ये रविवारी थोडी सुधारणा दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भारतीय हॉकी संघाचे त्यांनी नेतृत्व केले होते.

Related Stories

अतुल बेदाडे यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

Patil_p

मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा शानदार विजय

Patil_p

डेन्मार्कचा रूने म्युनिच स्पर्धेत विजेता

Patil_p

सुदीप-मजुमदार यांची द्विशतकी भागीदारी

Patil_p

कृत्रिम पदार्थ वापरण्यास परवानगी द्यावी : कमिन्स

Patil_p

डेक्कन चार्जर्सला 4800 कोटी रुपये देण्याचा बीसीसीआयला आदेश

Patil_p