Tarun Bharat

माजी IG कुंवर विजय प्रताप यांचा ‘आप’मध्ये प्रवेश ; केजरीवाल म्हणाले…

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पंजाबचे माजी IG कुंवर विजय प्रताप यांनी आप पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पंजाबमधील राजकारणात पाय रोवून उभा राहत असलेल्या आम आदमी पक्षाला आणखी मजबुती मिळाली आहे. 


यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, कुंवर विजय प्रताप हे काही राजकारणी नाही आहेत. त्यांना ‘आम आदमी का पुलिसवाला’ असे म्हटले जाते. आम्ही सर्वजण इथे देशाची सेवा करण्यासाठी आहोत. याच भावनेसह ते आज आप पक्षात सहभागी झाले आहेत. 


पुढे ते म्हणाले, मी आज पंजाबच्या नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो की, पंजाबमध्ये जेव्हा आप सरकार येईल त्यावेळी आम्ही बरगाडी कांडमधील दोषींना शिक्षा देऊन पंजाबच्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ. यावेळी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबाबत विचारले असता केजरीवाल म्हणाले, पंजाबसाठी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे सिख समुदायाचे असतील. ही अशी एक व्यक्ती असेल  जिचा पूर्ण पंजाबला गर्व असेल. 


पुढे ते म्हणाले, पंजाब सध्या खराब परिस्थितीतून जात आहे. जेव्हा पूर्ण पंजाब संकटात होता तेव्हा सत्ताधारी पार्टीचे नेते खुर्चीसाठी भांडत होते, त्यामुळे पंजाबमधील जनतेला बदल पाहिजे आहे आणि सद्य स्थितीत आम आदमी पक्ष हीच त्याच्यासमोर उम्मिद आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

Related Stories

हिंदी महासागरात ऐतिहासिक युद्धाभ्यासास प्रारंभ

Patil_p

नर्स निहा खानला अटक होणार ?

Amit Kulkarni

विशेष न्यायालयाकडून येडियुराप्पांना समन्स

Patil_p

स्वराज्यच्या बोधचिन्हासाठी संभाजीराजेंचं जनतेला आवाहन

Archana Banage

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ओमप्रकाश चौटाला दोषी

Patil_p

ऊर्जा क्षेत्राच्या सामर्थ्याची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!