Tarun Bharat

ई-पिक नोंदणीबाबत ओटवणेत मार्गदर्शन

ई पिक नोंदणीबाबत माहिती देताना मंडळ अधिकारी आर वाय राणे बाजूला तलाठी भक्ती सावंत

ओटवणे / प्रतिनिधी:
माझी शेती म्हणून सातबारा मीच नोंदवणार माझा पिक पेरा’ या अंतर्गत शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या जमिनीतील पिकाची नोंद प्रत्येक खातेदाराने करावी असे आवाहन ओटवणे सजाच्या तलाठी भक्ती सावंत यांनी केले.
यावेळी बांदा मंडळ अधिकारी आर वाय राणे, ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर, उपसरपंच उज्वला बुराण, ग्रामसेविका ममता कदम, ग्रामपंचायत सदस्य गुंडू जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी ॲपद्वारे पिकाची नोंद कशी करायची याची माहिती देण्यात आली.
सातबारा संगणीकरण झाले. आता पीक पाहणी संगणीकरण करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची दोन करता येणार आहे. शासनाच्या ई-पिकपाहणी योजेनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची पिक पेऱ्यांची नोंद करावयाची आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये ई-पिकपाहणी अँप डाउनलोड करून त्यात आपल्या शेतात केलेल्या भात, आंबा, सुपारी, नागली, माडबाग आणि बांधावरची झाडे या पिकांची ऑनलाईन नोंदणी करून ती आपल्या सातबारा सदरी नोंद करून घेण्यासाठी शासनाने ही सुविधा दिलेली आहे.
शेतकऱ्यांच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन करून ई–पिकपाहणी नोंदी करण्याबाबत आणि शासनाच्या ई-पीकपाहणी योजनेचे महत्व यावेळी सांगण्यात आले. पीकपाहणी व नोंदणीला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत उर्वरीत शेतकऱ्यांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करून शासनाच्या या पिकपाहणी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बांदा मंडळ अधिकारी आर वाय राणे यांनी केले आहे.

Related Stories

गळ टोचणी कार्यक्रमाने आणले अंगावर शहारे!

Patil_p

ठाण्यातील आंब्याना मिळाले भौगोलिक मानांकन

Patil_p

मजूर टेम्पोतून निघाले ‘यूपी’ला

NIKHIL_N

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा!

NIKHIL_N

मंडणगडातील बंदरे विकासाच्या अपेक्षा वाढल्या!

Patil_p

मेर्वीत बिबटय़ाला पकडण्यासाठी मुंबईतून वनविभागाचे पथक रत्नागिरीत

Patil_p