Tarun Bharat

माझी चौकशी डोमिनिकामध्येच करा!

उपचारांसाठी भारत सोडल्याचा कांगावा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घालून भारताबाहेर पळालेल्या मेहुल चोक्सी याने आपली चौकशी डोमिनिका या देशातच करा अशी मागणी की आहे. सध्या तो अमेरिकेकडून डोमिनिकात पळालेला आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय अधिकारी त्या देशात गेले होते.

आपण कायदा पाळणारे नागरिक आहोत. चौकशीला घाबरून आपण भारत सोडलेला नाही. आपल्याला चांगले उपचार अमेरिकेत करून घ्यावयाचे होते. म्हणून आपण देश सोडला. आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार असून सीबीआयने सध्या आपण वास्तव्यास असलेल्या डोमिनिका या देशातच आपली चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन त्याने या देशाच्या उच्च न्यायालयात शनिवारी सादर केले. आपले प्रत्यार्पण भारताला करू नये, अशी विनंती करणारी याचिका त्याने डोमिनिका देशाच्या उच्च न्यायालयात सादर केली आहे. सध्या त्यावर सुनावणी सुरू असून न्यायालयाने त्याला अद्याप दिलासा दिलेला नाही.

सीबीआय पथक परतले

चोक्सी डोमिनिकात आहे हे समजताच सीबीआयचे विशेष पथक तेथे गेले होते. मात्र, तेथील उच्च न्यायालयातील सुनावणी महिनाभर लांबणीवर पडल्याने ते आता भारतात परतले आहे. आवश्यकता भासल्यास पुन्हा तेथे जाण्याची सीबीआयची योजना आहे. चोक्सीच्या वकिलांनी हेबियस कॉर्पस याचिका सादर केली असून या याचिकेवर निर्णय होईपर्यंत तो डोमिनिकातच राहणार आहे.

Related Stories

राज्यसभा खासदार महेंद्र प्रसाद कालवश

Patil_p

19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्धाटन समारंभावर बहिष्कार

Abhijeet Khandekar

अमृतसर : किसान मजदुर संघर्ष समितीचे ‘या’ मागणीसाठी आंदोलन

Tousif Mujawar

पहिल्या दिवशी १५-१८ वर्षांच्या ४१ लाख टीनएजर्सना लस

Abhijeet Khandekar

आईने भरला अर्ज, अनुप्रियांनी भाजपला दिला मतदारसंघ

Patil_p

पंजाबमध्ये 748 नवे कोरोना रुग्ण; 731 कोरोनामुक्त!

Tousif Mujawar
error: Content is protected !!