Tarun Bharat

‘माझी वसुंधरा’मध्ये साताऱयाची मान उंचावली

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान, नगरपालिका गटात कराड नगरपालिका प्रथम

प्रतिनिधी/ सातारा

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे सातारा जिह्याचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा पुणे विभागात द्वितीय तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचा पुणे विभागात प्रथम पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सातारा पालिकेचा अमृत गटात तृतीय क्रमांक तर कराड पालिकेचा नगरपालिका गटात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामुळे सातारा जिह्याची पुन्हा एकदा मान उंचावली आहे. दरम्यान, दहिवडी आणि मान्याचीवाडी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

  सातारा जिह्याने शासनाच्या अनेक उपक्रमामध्ये आजपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. अनेक अभियानामध्ये सातारी पॅटर्न तयार झाला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सातारा जिह्याने चांगले काम केले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी हे अभियान शहरी व ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल यादृष्टीने सूचना दिल्या होत्या. तशी कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयासह गावपातळीवर प्रयत्न सुरु होते. माझी वसुंधरा अभियानाचे महत्व प्रत्येक नागरिकांना पटवून देण्यासाठी प्रबोधनात्मक पथनाटय़ेही काही ठिकाणी केली होती. झाडे लावण्यात आली होती. संगोपन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

 दरम्यान, याच कामाची दखल घेऊन पुरस्कारासाठी सातारा जिह्यातील सातारा नगरपालिका, कराड नगरपालिका, दहिवडी नगरपंचायत, मान्याचीवाडी ग्रामपंचायत, सातारा जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात आला. यामध्ये सातारा जिह्यातील अमृत राज्य पुरस्कारामध्ये सातारा नगरपालिकेचा 3 क्रमांक पटकावला. हा पुरस्कार मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह टीमने स्वीकारला. नगरपालिका राज्य पुरस्कारामध्ये कराड पालिकेला प्रथम कमांकाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचा स्वीकार मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्वीकारला. नगरपंचायत उंच उडी पुरस्कारामध्ये दहिवडी नगरपंचायतीचा पुरस्कार मुख्याधिकारी अवधुत कुंभार यांनी स्वीकारला. ग्रामपंचायतीमध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला पुणे विभागात प्रथम, उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिंह म्हणून पुणे विभागात सातारा द्वितीय, विभागीय पुरस्कार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे विभागात विनय गौडा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सातारा पालिकेचे टीमच पुरस्कार स्वीकारण्यासाठी

सातारा शहराला मिळालेला हा दुसरा सन्मान आहे. या पुरस्कार स्वीकारण्यासाठी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वतः उपस्थिती लावली होती. मुख्याधिकारी अभिजित बापट, शहर अभियंता दिलीप चिद्रे, सिटी कोऑडिनेटर विशाल सुर्वे, आरोग्य मुकादम जगन्नाथ धडचिरे, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, स्वच्छता कर्मचारी अमित चव्हाण यांनी स्वीकारला.

Related Stories

सातारा गोळीबार प्रकरण : पुण्यातून तिघे अल्पवयीन संशियित ताब्यात

Kalyani Amanagi

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा; कृषीदिनी एकनाथ शिंदेंचा निर्धार

Abhijeet Khandekar

सध्याचे सरकार चोरांचे…याचे काही खरे नाही- प्रकाश आंबेडकर

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्ण एक, अख्ख गाव लॉकडाऊन

Archana Banage

एसटी कर्मचारी संप: परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Archana Banage

प्राधिकरणाच्या थकीत बिलावरील विलंब आकार माफ

datta jadhav
error: Content is protected !!