Tarun Bharat

माझे इंग्रजी उत्तम नाही!

सरन्यायाधीशांचा प्रांजळपणा ः इंग्रजीमध्ये चांगला वक्ता नसल्याची कबुली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांचा प्रांजळपणा पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे. मला उत्तम इंग्रजी येत नाही, तसेच मी चांगला वक्ता देखील नाही. आठवीच्या वर्गात पहिल्यांदा इंग्रजीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली होती अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी शनिवारी वायू प्रदूषणाच्या मुद्दय़ावरील सुनावणीदरम्यान केली आहे.

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायू प्रदूषणासाठी केवळ शेतकरी जबाबदार असल्याचे मला म्हणायचे नाही. वकिलांच्या स्वरुपात आमच्या भाषेचा अर्थ ज्याप्रकारे काढला जातो, त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो, तर यामागे असा अद्देश अजिबात नसतो असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीवेळी म्हटले होते. मेहतांच्या याच म्हणण्यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली आहे.

दुर्दैवाने मी चांगला वक्ता नाही. मी आठवीच्या वर्गापासून इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली होती. शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठी मला इंग्रजी उत्तमप्रकारे येत नाही. मी कायद्याचे शिक्षण इंग्रजी भाषेत घेतले होते असे मेहता म्हणाले होते. यावर बोलताना सरन्यायाधीशांनी आम्ही दोघेही एका नौकेवर सवार असून मी देखील कायद्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले असल्याचे म्हटले होते.

Related Stories

नियमांचा दाखला, दोन नावे शर्यतीतून बाहेर

Patil_p

पोलीस दलांच्या विकासासाठी 26 हजार कोटींचा निधी

datta jadhav

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली यांचे निधन

datta jadhav

सेन्सेक्स 520 अंकांनी वधारला

datta jadhav

पीएफआयमध्ये सिमीचे सदस्य कार्यरत

Patil_p

काँग्रेस-झामुमोत फूट? मुख्यमंत्री सोरेन दिल्लीत

Patil_p