Tarun Bharat

‘माझे घर, मालकी हक्क’

Advertisements

तृणमूल काँग्रेसचे गोमंतकीयांना आश्वासन : राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

गोमंतकीय हे गोव्यात बदल इच्छित आहेत. तृणमूल काँग्रेसच्या पूर्वीच्या गृहलक्ष्मी आणि युवाशक्ती कार्डसोबत ‘माझे घर, मालकी हक्क’ हे वचन एक नवीन आशा देणार आहे. गोमंतकीयांना तृणमूल काँग्रेसचे सरकार आल्यानंतर घराचा मालकी हक्क जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे तो मिळवून देण्यात येणार आहे, असे आश्वासन तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा, दोनापावला येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझे घर, मालकी हक्क’ या वचनाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी बोलताना दिले.

व्यासपीठावर राज्यसभा खासदार सुष्मिता देव, तृणमूल काँग्रेसचे नेते किरण कांदोळकर, चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, गोवा प्रभारी महुआ मोईत्रा व इतर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते ‘माझे घर, मालकी हक्क’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

1976 पूर्वीपासून गोव्यात राहणाऱयांना मालकी हक्क

गोमंतकीयांना मालकी हक्काने सुरक्षित करणे हा या योजनेचा मुख्य़ उद्देश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या विकासासाठी पुष्कळ ऋण घेतले परंतु त्यांना मालकी हक्क दिला नाही. गोमंतकीयांना हा घराचा मालकी हक्क देण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेस व मगोप युतीतील सरकार करणार आहे. सरकार स्थापन केल्यापासून 250 दिवसांच्या आत 1976 पूर्वीपासून गोव्यात राहणाऱया सर्व गोमंतकीय कुटुंबांना त्यांना घराचा मालकी हक्क देण्यात येणार असल्याचे आश्वासन फालेरो यांनी यावेळी दिले.

कुळ-मुंडकार प्रकरणे निकाली काढणार : ढवळीकर

कुळ-मुंडकार कायदा गोव्यात 1964 व 1975 साली अंमलात आणला होता. मगो पक्षातर्फे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी हा कायदा आणला होता. परंतु हळुहळु या कायद्याचे महत्त्व कमी करण्यात आले. मागील कित्येक वर्षे कुळ मुंडकार कायद्याची प्रकरणे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. ती मार्गी लागणे गरजेचे आहे. आताच्या काळात शंभर वर्षे जुने घर दुरूस्ती करायला मिळत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कुळ मूंडकारची प्रकरणे मामलेदारकडून न्यायालयात नेली. हा प्रश्न सुटणे आवश्यक आहे. 250 दिवसात प्रश्न सोडविण्यात येणार आहे. या कायद्यात सुटसुटीतपणा आणून गोमंतकीयांना सोयीस्कर करणार असल्याचे आश्वासन मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी यावेळी दिले. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या प्रचारगीताचे प्रकाशन करण्यात आले.

तृणमूल काँग्रेस पक्षाने गोमंतकीयांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. गृहलक्ष्मी योजनेत तीन लाख गोमंतकीयांची नोंदणी झाली आहे. तसेच युवाशक्ती कार्ड योजनेसाठीही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठ महिन्यांच्या आत मूळ गोमंतकीयांना न्याय मिळणार असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते किरण कांदोळकर यांनी यावेळी दिली.

Related Stories

मुख्यमंत्री-राज्यपाल प्रकरण ‘पॅच-अप’

Patil_p

दिवाळीसाठी सजू लागल्या बाजारपेठा!

Amit Kulkarni

प्रा. सूरज रवींद्र मराठे यांना पीएचडी

Amit Kulkarni

काणकोणचा पाण्याचा प्रश्न 19 डिसेंबरपर्यंत सोडवा

Patil_p

निर्यात करवाढीमुळे खाणी पुन्हा संकटात

Amit Kulkarni

कोविडच्या दुसऱया लाटेत ईएसआय हॉस्पिटलात 1500 जणांवर उपचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!