Tarun Bharat

”माझे व्हिडीओ काढत मलाच कोर्टात खेचणाऱ्यांचं वाटोळं होणार”

निवृत्ती महाराज इंदुरीकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

ऑनलाईन टीम / तरुण भारत

संपुर्ण महाराष्ट्रभर किर्तनकार म्हणुन प्रसिद्ध असलेले अहमदनगरचे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असुन यावरुऩ पुन्हा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळेस इंदुरीकरांनी युट्यूबर्सवर टीका केलीय. मात्र ही टीका करताना त्यांचा तोल ढळल्याचं दिसून आलं आहे.

अकोला येथे सोमवारी आयोजित एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाजारांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदुरीकरांनी किर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावला. “चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

इतकच नाही तर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असंही वक्तव्य केल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनेने स्पष्ट केलं आहे. या किर्तनादरम्यान व्हिडीओ काढणाऱ्यांना इंदुरीकरांनी बऱ्याचदा हटकलं. संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.

यापुर्वी काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर

२०२० साली एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो, आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली. यावरुन अंनिसने ही निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरुद्ध समाजात अंधश्रद्धा पसरवल्याचे कारण देत तक्रार नोंदवली होती. यावरुन निवृत्ती महाराज इंदुरीकरांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या.

याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमधील घोटी येथील कार्यक्रमादरम्यान करोनासंदर्भात वक्तव्य करताना आपण लस घेतली नाही आणि घेणार ही नाही असं म्हटलं होतं. “मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं.

Related Stories

महागड्या कपड्यांच्या आरोपांवर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

datta jadhav

फत्त्यापुरात एकावर तलवार हल्ला

Archana Banage

वाढदिनीच माजी आमदाराचं निधन, काँग्रेस नेते मधुकर ठाकूर कालवश

Archana Banage

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्याचे फडणवीसांना आमंत्रण नाही ; भाजप नेते नाराज

Archana Banage

युरिया खताच्या दुष्काळाने शेतकरी हतबल

Archana Banage

शिंगाणापुरात घर जाळण्याचा प्रयत्न, ७ जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar