Tarun Bharat

माझ्यात आणि शिवकुमारांमध्ये कोणताही संघर्ष नाही: सिद्धरामय्या

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. राज्यत आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण ? यावरून हा वाद असल्याचं समजतंय. परंतु याआधीही दोन्ही नेत्यांनी आपल्यामध्ये कोणताही वाद नासल्याचे म्हंटले आहे. आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवकुमार आणि त्यांच्यात वाद सुरु असतेल्या बातम्यांवर भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्यात आणि शिवकुमारांमध्ये कोणताही संघर्ष नसल्याचे म्हंटले आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना तुमच्यात आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात वाद आहे का असं विचारलं असता त्यांनी माझ्यात आणि डी. के. शिवकुमारमध्ये कोणताही संघर्ष नाही. आम्ही दोघेही एक आहोत. आम्ही पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र काम करून आहोत, असे ते म्हणाले.

तसेच कर्नाटक कॉंग्रेसमध्ये कोणताही फूट पडलेली नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येईल. तसेच आम्ही सर्व भाजपच्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढत आहोत असे सिद्धरामय्या म्हणाले.

Related Stories

अनुसूचित जमातीसाच्या आरक्षणात भाजप सरकार वाढ करणार : श्रीरामुलू

Archana Banage

उद्योगांच्या समस्यांबाबत लवकरच निर्णय

Amit Kulkarni

कर्नाटक: डोप टेस्टवरून अभिनेत्री संजना संतापली

Archana Banage

विद्यार्थ्यांना केवळ 5 रुपयांत भोजन

Amit Kulkarni

कर्नाटकः नव्या राज्यपालांचा शपथविधी ११ जुलै रोजी

Archana Banage

कृष्ण जन्माष्टमीदिवशीच हिंसाचाराचा होता कट

Amit Kulkarni
error: Content is protected !!