Tarun Bharat

माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सहकारमंत्र्यांचाच यंत्रणेवर दबाव : दरेकर

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

माझ्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मारुन मुटकून जबरदस्तीने करण्यात आली आहे. दहा वर्षापुर्वी ती तक्रार बी समरी करण्यात आली होती. मुंबई जिल्हा बँक ही एकटीच जिल्हा बँक नाही. राज्यात इतरही जिल्हा बँका आहेत. त्या जिल्हा बँकाकडे आता माहिती मागवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सहकारी संस्था धुतल्या तांदळासारख्या आहेत का?, माझ्यावर केस दाखल करण्यामागे सहकारमंत्र्यांचाच यंत्रणेवर दबाव होता, असा गौप्यस्फोट साताऱ्यात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

साताऱ्यात जिल्हा बँकेच्या व्यवहाराबाबत माहिती घेण्याकरता प्रवीण दरेकर आले असताना ते शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, खोटे गुन्हे दाखल करुन मला अडकवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. विरोधी पक्षाचा नेता म्हणून सरकारचे वाभाडे काढतो आहे. जनतेच्या हितासाठी काम करतो आहे. त्याचा सुड उगवायचा म्हणून अशा पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. सन्मानीय न्यायालयाला पटवून दिले आहे. त्यामुळे न्यायालयाने सोमवारपर्यंत मोकळीक दिली आहे. मुंबई जिल्हा बँक ही राज्यात एकच नाही. सांगली जिल्हा बँक आहे, सातारा जिल्हा बँक आहे. पुणे जिल्हा बँक आहे. कोल्हापूर जिल्हा बँक आहे. अर्ध्या बँका यांनी तर विकून खाल्या. या सगळय़ा गोष्टींचा हिशोब चुकता होणार आहे. राज्यात पंधरा हजार मजूर सहकारी संस्था आहेत. प्रत्येकी 25 सदस्य आहेत. साधारण अडीच तीन लाख लोक आहेत. त्या सर्वांवर गुन्हे दाखल करणार आहात का?, त्याच्यात 90 टक्के लोक हे राष्ट्रवादीचे आहेत. जे लेबर फेडरेशनवर संचालक आहेत, काही जण बँकेवर आहेत. माझ्यावर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केले तसेच राज्यात इतरांच्यावर गुन्हे दाखल करणार का? अशी विचारणा विधानसभेत करणार आहे.

मी चार जिल्हा मध्यवर्ती बँकेची माहिती मागवली आहे त्यामध्ये. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर यांचा समावेश आहे. ज्या दहा कारणासाठी चौकशी लावली. त्याच दहा कारणाची जिल्हा बँकेची माहिती मागवली आहे. जे निकष असतात तेच पुर्ण करुन निवडणूकीला उभा राहत असतो. नंतर तो सक्षम होत असतो. रजिस्टेशन करणारे तुमचेच सहकार खातेच असते. दरवर्षी तपासणी होत असते. तेव्हा काय झोपा काढत होता का?, दुसऱ्यावर दगड मारताना आपल्याकडे काय सुरु आहे. आपल्या संस्था काय करतात. याचा पण हिशोब राज्यातील जनतेला द्यावा लागणार आहे, असेही दरेकर म्हणाले.

Related Stories

करंटय़ा पदाधिकाऱयांनी विम्याचा हप्ताच भरला नाही

Amit Kulkarni

महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Amit Kulkarni

सामाजिक बांधिलकी जपत पंधरा गुंठे जागा दिली दवाखान्यासाठी

Abhijeet Shinde

इंग्रजी शाळांच्या लढय़ाला मोठे यश- राजेंद्र चोरगे

Patil_p

तालुकास्तरावर पेन्शन अदालतीचे आयोजन

datta jadhav

साताऱ्याची भाजप दोन्ही राजेंशिवाय

Patil_p
error: Content is protected !!