Tarun Bharat

माझ्यासाठी नको पक्षासाठी उमेदवारी द्या

जिल्हा बँकेसाठी काँग्रेसच्या मुलाखती पार

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे पार पडल्या. नऊ जागांसाठी तब्बल 42 जणांनी उमेदवारीसाठी दावा केला. पालकमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, आमदार पी एन पाटील यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आसगावकर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे प्रमुख उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता मुलाखतीस प्रारंभ झाला. तालुकानिहाय आणि गटनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुक उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुलाखतीसाठी येत होते. त्यामुळे काँग्रेस कमिटी परिसर गर्दीने फुलला होता. दुपारी एक पर्यंत या मुलाखती सुरू होत्या. मुलाखती मध्ये विद्यमान संचालक उदयानीदेवी साळुंखे, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, गुलाबराव घोरपडे, संग्राम नलवडे, विलास गाताडे, विजयसिंह मोरे आदींचा समावेश होता.

Related Stories

शेती पिक व इतर नुकसानीचे पंचनामे शनिवारपासून गतीने होणार

Archana Banage

Kolhapur Jaggeri कर्नाटकी गुळाला कोल्हापूरचे लेबल लावल्यास कारवाई

Abhijeet Khandekar

‘टीपी’ने भरले महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 21 कोटी

Archana Banage

`स्कूल कनेक्ट’ची `पॉलिटेक्निक’ला `पॉवर’!

Archana Banage

राधानगरी तालुक्यातील ११ हजार ७०६ शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान मंजूर

Archana Banage

ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार

Archana Banage