Tarun Bharat

यावर्षीचाही शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे संभाजीराजेंचे शिवभक्तांना आवाहन

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले आहे. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक 5 व 6 जूनला थाटामाटात साजरा होत असतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकार ने केवळ 20 लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. यंदा सुद्धा “शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात” साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल असे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे यांनी ट्ववीट करत म्हटले आहे की, मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज हे वातावरण अनुभवायला आपण उत्सुक आहोत पण, कोरोना संकटामुळे मर्यादा येत आहेत. ​​​

याहीवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते. सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला. तसेच, निसर्ग वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना, आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या परंपरेला खंड पडू देणार नाही, हा शब्द मी सर्वांना दिला होता. तो मी पूर्ण केला. दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे.

स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी…! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन.

Related Stories

जिल्हा परिषद मैदान मॉर्निंग ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

Patil_p

मिरजेत घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून

Archana Banage

चिंताजनक : महाराष्ट्रात 36,902 नवे कोरोनाबाधित,112 मृत्यू

Tousif Mujawar

‘हा महाराष्ट्रचा अपमान झाला आहे’ : आदित्य ठाकरे

Abhijeet Khandekar

फलटण तालुक्यात परप्रांतीय युवकाची आत्महत्या

Patil_p

कृष्णा-वारणेतून २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात

Archana Banage
error: Content is protected !!