Tarun Bharat

माझ्या नावाचा वापर अपप्रचारासाठी नको

सुवर्णजेता नीरज चोप्राचे स्पष्ट प्रतिपादन

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

टोकिय्त संपन्न झालेल्या भालाफेक ऑलिम्पिक फायनलदरम्यान नीरज चोप्राचा भाला पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी ऍथलिट अर्शद नदीमने हाताळल्याचा व्हीडिओ मागील काही दिवसांपासून व्हायरल होत राहिला असून त्यावर अनेक कमेंट केल्या गेल्या. या पार्श्वभूमीवर, नीरजने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून माझ्या नावाचा अपप्रचारासाठी वापर करु नये, असे तो स्पष्टपणे म्हणाला.

23 वर्षीय नीरजने दि. 7 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्ण जिंकून दिले. भारतासाठी ऑलिम्पिक ऍथलेटिक्समधील हे पहिलेच सुवर्ण देखील ठरले. मात्र, यातील पहिल्या थ्रो दरम्यान नीरजला आपला भाला शोधण्यासाठी अंतिम क्षणी धावाधाव करावी लागली आणि त्यावेळी पाकिस्तानचा अर्शद नदीम तो भालाफेक हाताळत असल्याचे निदर्शनास आले होते.

नंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत गेला आणि काही युजर्सनी अर्शद नदीमवर टीका केली. ‘अर्शद नदीम हा नीरजचा भाला हाताळताना रंगेहाथ सापडला. प्रतिस्पर्ध्याचा भाला हाताळण्याची ही आगळीक कशासाठी’?, असा प्रश्न एका युजरने यावेळी केला.

काय सांगतो नियम? ऑलिम्पिकमधील नियमानुसार, स्पर्धकाने वा ऍथलिटने आयोजन समितीकडे नोंद केलेल्या भाल्याचा वापर त्याच्याशिवाय आणखी कोणताही स्पर्धक करु शकतो. त्यामुळे, अर्शदने नीरजचा भाला हाताळला तरी यात काहीच गैर ठरत नव्हते. पात्र ऍथलिटपैकी कोणताही प्रतिस्पर्धी होल्डिंग रॅकमधील कोणाचाही भाला वापरु शकतो. पोल व्हॉल्टचा अपवाद वगळता अन्य सर्व खेळात हाच नियम लागू होतो.

Related Stories

रशियाचा रूबलेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

माजी पाक कर्णधार इंझमाम-उल-हकवर अँजिओप्लॅस्टी

Patil_p

थिएम उपांत्यपूर्व फेरीत, नदाल शेवटच्या 16 खेळाडूंत

Amit Kulkarni

स्टॉपेज टाईममध्ये नेमारसह 5 खेळाडूंना रेड कार्ड

Patil_p

वर्ल्डकपसाठी धोनी मानधन घेणार नाही!

Patil_p