Tarun Bharat

‘माझ्या मंत्र्यांना हिंदी कळत नाही म्हणून…’; मिझोरोमच्या मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांना पत्र

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी राज्यामधील काही मंत्र्यांना हिंदी समजत नाही तर काहींना इंग्रजीही समजत नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रामध्ये ही माहिती दिली आहे. इतकच नाही तर शाह यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून मागणी करताना राज्याच्या मुख्य सचिवांना मिझो भाषेमधील कारभार समजत नसल्याने त्यांच्याऐवजी स्थानिक भाषा समजणाऱ्याला या पदावर नियुक्त करावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या मंत्रीमंडळामधील एकाही मंत्र्याला हिंदी भाषा कळत नाही त्यामुळे मुख्य सचिव हा मिझो भाषेचं ज्ञान असणारा सचिव असावा अशी मागणी मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सीजे रामथंगा यांची नियुक्ती करण्यात यावी आणि सध्या या पदावर असणाऱ्या रेणू शर्मा यांची बदली करावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केलीय. “माझ्या कार्यालयामध्ये काम करणारे माजी मुख्य सचिव लालनूमाविया चुआंगो हे गुजरात कॅडरचे अधिकारी निवृत्त झाल्यानंतर मी माझे सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. सी. रामथंगा (मणीपूर कॅडर) यांना मुख्य सचिव करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्रालयाने रेणू शर्मा यांना मुख्य सचिव म्हणून नियुक्त केलं,” असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पत्रात केलाय. हे पत्र २९ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आल्याचं एनडीटीव्हीनं म्हटलं आहे.

Advertisements

Related Stories

अरे भावा, मी भाजपचा नाही, काँग्रेसचा आहे – राहुल गांधी

Abhijeet Shinde

कोल्हापुरात केएमटीला आग, ५० हून अधिक प्रवासी बचावले

Abhijeet Shinde

…मात्र, फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही : प्रवीण दरेकर

Rohan_P

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक

Abhijeet Shinde

रस्तेदुर्घटना भरपाईसाठी कालमर्यादा निश्चित

Amit Kulkarni

माजी विधानसभा अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

datta jadhav
error: Content is protected !!