ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिका वैशाली भैसने हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट केली आहे. ”काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे” असे वैशालीने म्हटले आहे. वैशालीची पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.


सारेगमप या मराठी गायन रिॲलिटी शोचे विजेतेपद 2008 मध्ये वैशालीने पटकावले होते. त्यानंतर तिने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला. सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियाच्या “रॉक घराणा”ची ती सदस्या होती. सारेगमप चॅलेंज 2009 मधील तिच्या संपूर्ण प्रवासात तिने स्वतःला एक अष्टपैलू गायिका असल्याचे सिद्ध केले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वैशालीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.