Tarun Bharat

माटोळी बाजार भरण्याचे काणकावासीयांकडून स्वागत

उमाकांत कोरगावकर यांची माहिती, पंच बिचोलकर यांचा स्वार्थापोटी विरोध

प्रतिनिधी/ म्हापसा

कळंगूटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी स्थानिक सरपंच तसेच शिवोलीचे आमदारांना विश्वासात घेऊन काणका सर्कल ते बोडगेश्वर मंदिरपर्यंत गणेश चतुर्थीसाठी माटोळी बाजार भरविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही काणकावासीय स्वागत करीत आहोत, अशी माहिती आबासवाडा काणका येथील उमाकांत कोरगावकर यांनी दै. तरुण भारतशी बोलताना दिली.

या निर्णयामुळे नागरिक तसेच गोमंतकीय नागरिकांना अवघ्या चतुर्थीच्या काळात दोन दिवस आपला उदरनिर्वाह करण्यास वाव मिळणार आहे. स्थानिक पंच लक्ष्मीकांत बिचोलकर आपल्या वैयक्तिक कारणास्तव या बाजाराला विरोध करीत आहेत, असे कोरगावकर म्हणाले.

प्रथम बिगरगोमंतकीयांना खाली करा गेल्या चतुर्थीच्या बाजारात काणका सर्कलजवळ वॉर्ड सदस्य लक्ष्मीकांत बिचोलकर यांनी आपला विरोध दर्शविला होता. त्यांनी गेले सहा महिने या ठिकाणी बिगर गोमंतकीय नागरिक आणून भरलेले आहेत. ते मासे, चिकन, भाजी आदी सामानाची विक्री करीत आहेत. त्यांना प्रथम पंच बिचोलकर यांनी खाली करावे, अशी मागणी उमाकांत कोरगावकर यांनी केली आहे

Related Stories

रामनाथ दामोदर देवस्थानाला राज्यपाल पिल्लई यांची भेट

Amit Kulkarni

पाणी टंचाईवर वाळपई पाणी पुरवठा अधिकारी करणार मात

Amit Kulkarni

राज्यातील खाणी आठ महिन्यांत सुरु होणार

Amit Kulkarni

बेकायदा नोकरभरतीची चौकशी करावी

Omkar B

शहांवरील टीका दोन्ही मंत्र्यांना भोवणार

Amit Kulkarni

अती मद्य प्राशन करून दिल्लीतील बडय़ा धेंडांच्या सुपुत्राचा मोरजी पार्टीत धांगण धिंगाणा

Patil_p