Tarun Bharat

माडखोलचे सुपुत्र महेश आडेलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक

ओटवणे/ प्रतिनिधी-

माडखोल गावचे सुपुत्र तथा दिल्ली येथील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एस पी जी) वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक महेश लवू आडेलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले आहे. माडखोल गावचे दुसरे सुपुत्र तथा रायगडचे पोलीस उपनिरीक्षक संजय सावंत यांनाही त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. एकाच गावातील दोन सुपुत्रांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याने माडखोल गावच्या शिरपेचात दुहेरी मानाचा तुरा रोवला गेला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या एसपीजीच्या वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक पदावर महेश आडेलकर कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात येते. त्यानुसार महेश आडेलकर यांच्या आजपर्यंतच्या सेवेची दखल घेऊन त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. महेश आडेलकर यांच्या त्याच्या २९ वर्षातील उत्कृष्ट, प्रामाणिक व उल्लेखनिय निस्वार्थी सेवेसाठी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


महेश आडेलकर यांचे प्राथमिक शिक्षण माडखोल गावातील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर पदवी शिक्षण सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयात झाले. पुढे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात त्यांनी इंग्रजी विषय घेऊन एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले. याचवेळी दिल्लीत इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून त्यांनी पत्रकारीतेमध्ये डिप्लोमा केला. १९९३ मध्ये सीमा सुरक्षा दलात रूजू झालेल्या महेश आडेलकर यांनी काश्मीर, गुजरात आणि दिल्ली आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे. लष्करात सेवा करतानाच आपल्या मराठी भाषेची आवड जोपासताना महेश आडेलकर यांनी आतापर्यंत अनेक कविता पण केलेल्या आहेत.

Related Stories

आचरा गाऊडवाडी येथील सखाराम गावकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

आणखी 5 जणांना डिस्चार्ज

Patil_p

परवानगी प्राप्त नागरिकांसाठी आठ जिल्हयांमध्ये 25 एस.टी. ची व्यवस्था

Archana Banage

देवसु आणि वेर्लेतील गरजूंना अन्नधान्याचे वितरण

Anuja Kudatarkar

दीक्षित गेडाम यांना अनोखी मानवंदना

NIKHIL_N

सावित्रीच्या हजारो लेकींशी ‘बांधिलकी’

Archana Banage