Tarun Bharat

माडखोल सोसायटी निवडणुकीत भाजपचा महविकास आघाडीला धक्का

१३ पैकी १३ जागा पटकावित निर्विवाद वर्चस्व

Advertisements

ओटवणे/ प्रतिनिधी

माडखोल सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने ११ पैकी ११ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवीत काँग्रेस महाविकास आघाडी पॅनेलला धक्का दिला. यापूर्वी भाजपप्रणीत पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

भाजपप्रणीत पॅनलचे विजयी उमेदवार आणि मते आनंद पुंडलिक राऊळ (१५८), संजय मुकुंद राऊळ (१५३), सुरेश नारायण आडेलकर (१५२), कृष्णा सुमन राऊळ (१५०), नंदू गोविंद दळवी (१४६), जनार्दन राजाराम लातये (१४६), प्रकाश आत्माराम नाईक (१४३) विष्णू आत्माराम ठाकूर (१४१ ), महिला प्रतिनिधी गट गोपिका मधुकर राऊळ (१४४), रंजीता रामकृष्ण चव्हाण (१४३), अनुसूचित जाती जमाती गट भिकाजी सदाशिव जाधव (१६५) यापूर्वी विजय पॅनेलचे सोसायटीचे विद्यमान चेअरमन दत्‍ताराम राघोबा कोळमेकर आणि संतोष लक्ष्‍मण मेस्त्री बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक अधिकारी म्हणून आरोंदेकर यांनी काम पाहिले.

सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचे भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, तालुकाध्यक्ष महेश धुरी, राजन राऊळ, दत्तू राऊळ, बाळा पालेकर, चंदन धुरी, मधू देसाई यांनी अभिनंदन केले.

Related Stories

माडखोल पाणी वापर संस्थेची निवडणूक प्रक्रिया अखेर स्थगित

NIKHIL_N

80 लाखाचे फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी

NIKHIL_N

कुडाळ : भातशेतीच्या पंचनाम्यांचा आढावा

NIKHIL_N

विद्यार्थी आधार नोंदणीत सिंधुदुर्ग अव्वल

NIKHIL_N

बांदा केंद्रशाळेत चैतन्यमय वातावरणात शाळेचा पहिला दिवस

NIKHIL_N

आता वर्षातून तीनदाच मिळणार जाळी भरपाई

NIKHIL_N
error: Content is protected !!