Tarun Bharat

माढा तालुक्याच्या चिंतेत भर, ८ रुग्णांची वाढ

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यातील भोसरे व रिधोरे येथील प्रलंबित असलेले ५ ही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे. बाधित रूग्ण हे पूर्वीच्या रुग्णाच्याच संपर्कातील असून शनिवारी माढा तालुक्यात ८ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे.

बाधित रुग्णांमध्ये भोसरे येथे दोन पुरुष व तीन वर्षाची लहान मुलगी असे एकूण तीन, रिधोरे येथे दोन पुरुष, अक्कलकोट येथील रुग्णाच्या संपर्कातील मोडनिंब येथील दोन पुरुष व बार्शी येथे उपचार घेत असलेला चिंचगाव येथील एक महिला रुग्ण मयत आहे. असे एकुण ८ रुग्ण माढा तालुक्यात वाढले आहेत. यातील ५ जण कुर्डुवाडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. माढा तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजपर्यंत माढा तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण २६ झाले आहेत.

या सर्व ठिकाणी प्रशासन वेगवेगळ्या टीमने कामाला लागले असून सदर परिसर ५०० मीटर कन्टेन्मेंट व बफर झोन करण्यात आला आहे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असून त्यानुसार हायरिस्क आणि लोरिस्क अशी यादी काढली जात आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पलंगे यांनी दिली.

Related Stories

भिंत कोसळून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर : शेततळ्यात बुडून कर्देहळ्ळीतील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Archana Banage

बार्शी आणि वैराग शहर पंधरा दिवस लॉकडाउन

Archana Banage

पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी

Archana Banage

अजित पवारांवर शरद पवार विश्वास ठेवत नाहीत- अजयकुमार मिश्रा

Archana Banage

सोलापूर : प्रहार’च्या कार्यकर्त्यांकडून महसूल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

Archana Banage
error: Content is protected !!