Tarun Bharat

माढ्यात राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडीकडून चौकशी

ऑनलाईन टीम / सोलापूर :

राष्ट्रवादीचे माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे. हे कर्ज कर्जमाफीत माफ करणे, तसेच सूतगिरणी खरेदीसह विविध विषयात ईडीने मागील दोन महिन्यात तीन वेळा शिंदे यांची चौकशी केली असून, हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.

बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या सहकारी तसेच खासगी संस्थांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी केली होती. साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या नावे परस्पर कर्ज उचलणे आणि ते कर्जमाफीत माफ करणे, सुतगिरणीतील गैरव्यवहार आदी प्रकरणांशी संबंधित शिंदे यांची चौकशी सुरू आहे.

मागील दोन महिन्यापासून शिंदे पितापुत्रांची तीन वेळा चौकशी झाली आहे. शिंदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, ईडी पुढचं पाऊल काय उचलणार याची माढय़ात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Stories

By polls Results : उत्तर प्रदेशात भाजपचा विजय; तर दिल्लीमध्ये ‘आप’ विजयी

Archana Banage

रामकृष्ण सेवा मंडळ साताराच्यावतीने मदत

Patil_p

सांगली ते बारामती, कराड ते पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण कधी ?

Archana Banage

कुटुंबप्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास वारसांना पेन्शन

Patil_p

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 1380 वर

Tousif Mujawar

ग्रामीण यात्रास्थळे विकासासाठी 9कोटी 53 लाखांची गरज

Amit Kulkarni