Tarun Bharat

माणचा सुपूत्र देशासाठी हुतात्मा

प्रतिनिधी/ म्हसवड/ लोधवडे  

राजस्थान येथील भारतीय सेना दलात मॅकेनिक पदावर काम करत असलेला संभुखेड (ता.माण) येथील जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 26) या जवानाचा दिनांक 20 ऍक्टोबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान मृत्यू झाला. संभुखेडमधील जवान हुतात्मा झाल्याने संभुखेडसह परिसरात शोककळा पसरले. जवानाच्या आईचा हंबरडय़ाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे पार्थीव पुणे येथून रात्री उशीरा संभुखेड गावी अंत्यस्कारासाठी आणण्यात येणार आहे.

 संभूखेडमधील सामान्य रंगकाम व शेतकरी सामान्य कुटुंबात विश्वनाथ व उषा काटे या दाम्पत्याच्या पोटी सचिनचा 15 जून 1997 रोजी जन्म झाला. विश्वनाथ काटे यांना दोन मुले. मोठा मुलगा सचिन राजस्थानमध्ये देशसेवेसाठी कार्यरत होते तर लहान रेवन काटे हा आसाममध्ये सध्या दोघेही देशसेवेसाठी कार्यरत आहेत. हुतात्मा सचिन काटे याचे प्राथमिक शिक्षण हे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत, 10 वीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण तेथेच घेतले. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेमधून महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले.

  पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दहिवडी कॉलेज दहिवडी येथे कला शाखेत प्रवेश घेऊन एन.सी.सी. जॉईन केली. मात्र याच वर्षी 2016 मध्ये ते मिलीटरीमध्ये भरती झाला. शालेय जीवनात असताना त्याला कबड्डी खेळाची आवड होती. विज्ञान शाखेमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्याने टेक्नीकलमधून रणगाडा ट्रेड मॅकेनिकल म्हणून भरती झाला. सिकंदराबाद येथे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तो राजस्थानमध्ये देशसेवेसाठी कार्यरत होता. लहानपणापासून देशसेवेची ओढ असल्याने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 19 व्या वर्षी आर्मीमध्ये भरती झाले.      

   बुधवारी रात्री साडे आठ वाजता सचिनने आई-वडिलांना फोनवरुन तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर रात्री 11 च्या दरम्यान राजस्थान येथील भारतीय जवान  कॅम्पमधून वडील विश्वीनाथ काटे यांना तुम्ही राजस्थानला निघून या असा फोन आला. सदर घटना खरी असल्याची घरच्या त्याच्या छोटय़ा भावाकडून घरच्या समजली. दरम्यान शुक्रवारी दुपारी 3 वाजता प्रभारी निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे, मार्डी मंडल अधिकारी सुनिल खेडेकर, महसूल सहाय्यक तुषार पोळ, तलाठी जी. एम. रसाळ, एपीआय बाजीराव ढेकळे, मार्केट कमेटी चेअरमन विलास देशमुख, पोलीस पाटील नरळे यांनी संभूखेड गावा शेजारील जागेवर जवान सचिन यांचा अंत्यविधी करण्याची जागा पहाणी करण्यात आली.

  शनिवारी त्यांचे पार्थिव पहाटे 2 वाजता संभुखेडमधील प्राथमिक शाळेच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता शासकीय इतमामात अग्नग्नी देण्यात येणार आहे. त्यामुळे जवान सचिन काटे यांच्या मृत्यू नक्की कसा आणि कशाने  झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती.   

माणचे आजपर्यंत पंधरा सुपूत्र हुतात्मा

भारतमातेची सेवा करत असताना माण तालुक्यातील आजपर्यंत सचिन काटे यांच्यासह पंधरा सुपूत्र हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा सचिन काटे यांच्या अगोदर नामदेव देवकर (मोही), सोपान जगदाळे (शिरवली), सदाशिव जगदाळे (बिदाल), श्रीपती खाडे (पळशी), शिवाजी जगदाळे (बिदाल), गजानन वाघमारे (राणंद), आनंदराव पिसाळ (स्वरुपखानवाडी), सलीम हवालदार (दहिवडी), अर्जुन माळवे (पळशी), दिनकर नाळे (दहिवडी), निलेश जाधव (लोधवडे), दत्तात्रय सत्रे (सत्रेवाडी), सुनिल सुर्यवंशी (मस्करवाडी), चंद्रकांत गंलडे (जाशी) हे पंधरा जवानांना विरमरण आले आहे. या सर्व हुतात्मा जवानांचे बलीदान कदापी व्यर्थ जाणार नाहीत.  

Related Stories

व्यापाऱ्याला मारण्याची धमकी, छगन भुजबळ यांच्यासह दोघांवर गुन्हा

datta jadhav

भारतीय हद्दीत चीननं वसवलेलं गाव आधी उखडा…

datta jadhav

रविवार पेठेतल्या मृत बधिताच्या संपर्कातले 6 जण बाधित

Patil_p

साताऱयात दुषित पाण्यात धुतला जातोय भाजीपाला

Patil_p

गोवा पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमक’ असा उल्लेख

Archana Banage

मुंबईच्या माजी महापौरांना अटक,सोमय्या हल्ला प्रकरणात कारवाई

Archana Banage