Tarun Bharat

माणशी पन्नास किलो अन्नधान्य जातंय वाया…

Advertisements

एकीकडं अन्नधान्यांच्या किमती वाढत असताना, भारतात प्रत्येक माणसामागं 50 किलो धान्य वाया जातंय, असा विरोधाभास आहे. केवळ भारतातंच नव्हे, तर संपूर्ण जगातच 2019 मध्ये एकंदर 93 कोटी टनांच्या आसपास धान्य वाया गेलं आहे. भारतात हे प्रमाण 6.8 कोटी टन इतकं मोठं आहे. खरं तर पानात काही टाकायचं नाही असे संस्कार आपल्यावर लहानपणापासून होतात. तसंच ‘खाऊन माजा, पण टाकून माजू नका,’ अशा म्हणीही आपल्याकडं प्रचलित आहेत. तरीही इतक्या मोठय़ा प्रमाणात धान्य वाया जातच आहे.

याची कारण्ंा अनेक आहेत. धान्य साठविण्यासाठी पुरेशी आणि सुरक्षित गोदामं नसणं, वाहतूक करताना धान्याची नासाडी होणं, उंदरांकडून मोठय़ा प्रमाणात ते फस्त होणं अशी अनेक कारणं आहेत, जी नाहीशी करता येण्यासारखी आहेत. वाया जाणाऱया अन्नधान्यांपैकी साधारणतः 40 टक्के घरातच वाया जातं असं निरीक्षण तज्ञांनी नोंदविलं आहे. कारणं काहीही असली तरी परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत, जे टाळता येणं शक्य नाही.

उपासमार भारतात मोठय़ा प्रमाणात

2019 उपासमारीच्या कोष्टकात भारत 117 देशांमध्ये 102 व्या क्रमांकावर होता. काही छोटे देशही भारताच्या तुलनेत वरच्या क्रमांकावर (म्हणजेच जास्त चांगल्या स्थितीत) होते. वाया जाणारी अन्नधान्यं वाचवता आली तर उपासमारीच्या समस्येवर बऱयाच प्रमाणात तोडगा काढला जाऊ शकतो, असं तज्ञांना वाटतं. अर्थात, लोकांमध्ये यासंबंधी जागृती होणं, तसंच वाया जाणारं अन्न उपयोगात आणण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणं आवश्यक आहे.

Related Stories

काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना मारले

Patil_p

चित्रपट निर्माते सावन कुमार यांचा अलविदा

Amit Kulkarni

‘कोळशात’ उगवली स्ट्रॉबेरी

Patil_p

कुटीचक, बहुदक, हंस आणि परमहंस संन्यासी

Patil_p

अँटीबॉडी कॉकटेल औषध भारतात उपलब्ध

Patil_p

आसाममधून 25 कोटी रुपयांचे हेरोईन जप्त, एकाला अटक

Rohan_P
error: Content is protected !!