Tarun Bharat

माणसांमध्ये आला, अन् मृत्यू ओढवला

41 वर्षे जंगलात राहिला खरा टारझन

आधुनिक जगापासून वेगळा जंगलात 41 वर्षे जगणारा ‘रियल लाइफ टारझन’ हो वैन लँगचा मृत्यू झाला आहे. लँगला त्याच्या वडिलांसोबत 8 वर्षांपूर्वी जंगलांमधून ‘सिविलाइज्ड वर्ल्ड’मध्ये आणले गेले होते. लँगला माणसांसोबत जगणे मानवले नाही असेच म्हणावे लागणार आहे.

व्हिएतनामच्या जंगलांमध्ये 41 वर्षांपर्यंत राहिल्यावर लँगला मानवी संस्कृतीत आणले गेले होते. पण दुर्दैवाची बाब म्हणजे माणसांदरम्यान केवळ 8 वर्षांमध्येच खऱया टारझनचा मृत्यू ओढवला आहे. लँगच्या मृत्यूचे कारण यकृताचा कर्करोग आहे. सोमवारी या आजारामुळे लँगने अखेरचा श्वास घेतला आहे.

व्हिएतनामच्या बाजूने लढणारे लँगचे वडिल हो वान थान 1972 मध्ये जंगलांमध्ये राहण्यासाठी गेले होते. त्यावेळी व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेच्या बॉम्बवर्षावात त्यांचे निम्मे कुटुंब संपले होते. अशा स्थितीत जीव वाचविण्यासाठी दोघांनी जंगलात पलायन केले होते.

कित्येक दशके दोघेही पूर्णपणे आधुनिक जगापासून दूर राहिले. जंगलात मिळणारे मध, फळे आणि वन्यजीवांना भक्ष्य करत ते जगत होते. जंगलात राहिल्याने लँगला महिलांच्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती. 2013 मध्ये या दोघांबद्दल कळल्यावर त्यांना माणसांमध्ये आणले गेले. पण लँग मानवी संस्कृतीत रुळला नाही. त्याची प्रकृती बिघडत गेली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Related Stories

‘कोवॅक्सिन’ला मिळू शकते जागतिक मान्यता

datta jadhav

पक्षांचे सिग्नल्स ‘वाचण्यात’ यश

Patil_p

अमेरिकेत 16 वर्षावरील सर्वांना लसीकरण

datta jadhav

अमेरिकेची प्रथम महिला करतेय नोकरी

Patil_p

भूकंपग्रस्त हैतीतील मृतांचा आकडा 2

Patil_p

पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू, अल्पसंख्याकांची होतेय हत्या

Patil_p