Tarun Bharat

माणसाच्या जगण्याचा अर्थ शिक्षणातून शोधला पाहिजे!

Advertisements

प्रतिनिधी / कणकवली

माणसाच्या जगण्याचा अर्थ शिक्षणातून शोधता आला पाहिजे. यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आयडियल इंग्लिश स्कूल हे काम करत असल्यामुळे या विद्यालयाचे ज्ञानदानाचे कार्य उत्तमप्रकारे सुरू आहे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी वरवडे आयडियल इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटनप्रसंगी केले.

आयडियल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात कांडर यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, सहसचिव नीलेश महिंद्रकर, संस्था सदस्य श्रीमती बडे, विघ्नेश शिर्के, रुपेश खाडये, संस्थेचे सल्लागार डी. पी. तानवडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई, कॉलेज विभागप्रमुख मंदार मुंडले आदी उपस्थित होते.

जेठे म्हणाले, आपापल्या क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी एकत्र येऊन आयडियल इंग्लिश स्कूलसारखी शाळा चालवताहेत ही चांगली गोष्ट आहे. मुलांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिक्षण घ्यायला हवे. आज वेगवेगळय़ा क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. पत्रकारितेतही तरुण मुलांनी यायला हवे.

 शालेय स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्त प्राचीन कोकण, कोकणातील जुन्या काळातील वेगवेगळय़ा वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन या स्नेहसंमेलनाचे आकर्षण ठरले. शाळेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेले रांगोळी प्रदर्शन, पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेतील विजेत्यांमध्ये सौ. तोरसकर, सौ. गोवेकर, सौ. बावधने यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ हा लोककलांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी गण, गवळण, लावणी, धनगरी नृत्य, गोंधळ, जोगवा, दशावतार, बाल्या, शिवराज्याभिषेक असे विविध कलाप्रकार सादर करून रसिकांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या हस्ते झाले.

Related Stories

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल प्रशालेचा निकाल 98.75 टक्के

Ganeshprasad Gogate

‘ऍप’साठी शाळांचा पालकांवर दबाव

NIKHIL_N

आंबोली येथील अपघातात बँक कर्मचारी ठार

Ganeshprasad Gogate

मळगाव घाटरस्ता अखेर सर्व वाहतुकीसाठी खुला

Ganeshprasad Gogate

मालवण पर्यटकांनी फुलले…

NIKHIL_N

केंद्राची ऑप्टिकल फायबर इंटरनेट योजना सिंधुदुर्गमध्ये राबविणार!

NIKHIL_N
error: Content is protected !!