Tarun Bharat

माणुसकीच्या देवदूतांचा लोकमान्यकडून गौरव

Advertisements

सोहळय़ात सन्मानितांनी केले मनोगत व्यक्त

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या महामारीच्या काळात माणुसपण जपून माणसाच्या मदतीला धावून जाणारे सातारकर होते. त्याच सातारकरांचा गौरव लोकमान्य मल्टीपर्पज क्रेडीट सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून लोकमान्यच्या देवी चौक शाखेत औंध वस्तूसंग्रालयाचे निवृत्त अभिरक्षक भास्कर मेंहदेळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गौरव झालेल्या माणुसकीच्या देवदुतांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यावेळी घरात रहा सुरक्षीत रहा, असा संदेश प्रशासन देत होते. प्रत्येकावर संकट आले होते. मग ते कोनावर बेकारीचे असेल, कोणावर कोरोनामुळे बेड न मिळण्याचे असेल तर कोणावर आणखी कशाचे असेल, याच कोरोनाच्या काळात माणूस म्हणून माणसांच्या मदतीला धावून जाणारे साताऱयातील अनेक मंडळी आहेत. त्यांचा गौरव सोहळा साताऱयात लोकमान्यच्या देवी चौक शाखेत पार पडला. यावेळी भास्कर मेंहदळे यांच्या हस्ते माणुसकीचे दुत हे सन्मानपत्र, ग्रंथ,भेट वस्तू, भास्कर मेहंदळे यांनी बनवलेले स्वहस्तलिखीत भेटकार्ड देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये सवयभानचे राजेंद्र चोरगे यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी शहरात निर्जतुकीकरण फवारणी केली. कोरोनामुळे मृत झालेल्यांकरिता स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करुन दिली. सवयभानच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. डॉ. अजिंक्य दिवेकर यांनी शाहुपुरीत खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार सर्वप्रथम केले. 200 पेक्षा जास्त रुग्णांना त्यांनी बरे केले. डॉ. संदीप आठवले यांनी कोरोना विषयी वैज्ञानिक माहिती दिली. नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी यात्रेची वर्गणी लोकांच्यासाठी लोकांच्यासाठी वापरली. कोव्हिडमध्ये मृत झालेल्यांना नेण्यासाठी शववाहिनी उपलब्ध करुन दिली. विरेन जानी यांनी त्यांच्या श्रीराम स्वाध्याय परिवाराच्यावतीने तळागाळातल्यांना ऑकसीजन मशिन पुरवल्या. कोरोनाच्या योद्धांच्या सत्कार करण्यात आला. डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. हॉटेल व्यावसायिक सागर भोसले यांनी लोकांना आर्थिक मदत केली. जे कोरोना वॉरियर्स होते त्यांचीही त्यांनी काळजी घेतली. औषधे पुरवली. रेमीडेवीर इंजेक्शन उपलब्ध, रवी पवार यांनी परप्रांतिय लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रयत्न केले. प्लाझ्मा डोनरसाठी माहिती गोळा करुन प्लाझ्मा दान करण्यासाठी विनंती केली. ज्या रुग्णांना बेड मिळत नव्हता. त्यांना बेड मिळण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः कोरोना बाधित झाले तरीही त्यांची तीच धडपड तोच प्रयत्न सुरु होता. प्रवीण देशपांडे यांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून काम केले. तर कोव्हीड डिफेंडर ग्रुपचे विनीत पाटील रेडसेमीवीर या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दीपक प्रभावळकर, पोपटराव मोरे, वरीष्ठ शाखाधिकारी सुनील मोरे, अतुल पवार, रवीराज मोरे, रेषा हिंगमिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संदीप आठवले यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र चोरगे म्हणाले, आलेली आपत्ती खूप भयानक होती. या आपत्तीच्या काळात आलेले अनुभव पुस्तिका रुपात असायला हवी. जेणे करुन त्याचे आपल्याच अवलोकन करता येईल, असे त्यांनी मत व्यक्त केले. दीपक प्रभावळकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक सुनील मोरे यांनी केले.

Related Stories

सावंतवाडी नजीकच्या गावातील महिलेचा गोव्यात खून

Anuja Kudatarkar

सातारा : मस्करवाडीत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Abhijeet Khandekar

मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा मृत्यू

Patil_p

शिरोडा-वेळागर येथे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे आ. केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

Anuja Kudatarkar

कमी चाचण्यांमुळे जिह्याला तिसऱया लाटेचा धोका

Patil_p

हरहर विठ्ठल, घरघर विठ्ठल..

Patil_p
error: Content is protected !!