Tarun Bharat

मातीच्या ढिगाऱयामुळे अपघातांना निमंत्रण

Advertisements

एसपीएम रोडवरील प्रकार : डेनेज पाईपसाठी खोदलेला खड्डा उघडय़ावर

प्रतिनिधी /बेळगाव

शहापूर येथील एसपीएम रोडवर डेनेज पाईप घालण्यासाठी खोदण्यात आलेला खड्डा अद्यापही तसाच आहे. या खड्डय़ातून काढण्यात आलेली माती रस्त्यावरच टाकण्यात आल्याने वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. मोठे वाहन आल्यास ट्रफिक जामची समस्या उद्भवत आहे. अपघातांना निमंत्रण ठरणारा मातीचा ढिगारा हटवून डेनेजचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

एसपीएम रोडवर पंधरा दिवसांपूर्वी डेनेज पाईप घालण्यासाठी रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आली होती. यातील काही भागाचे काम पूर्ण झाल्याने माती टाकून तो बुजविण्यात आला आहे. परंतु काम अर्धवट झाल्यामुळे अद्यापही माती रस्त्याशेजारीच आहे. तो खड्डा खुला असल्यामुळे आसपासच्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. मातीच्या ढिगाऱयामुळे ही सर्व माती आसपासच्या घरांमध्ये जात आहे.

मातीच्या ढिगाऱयामुळे वाहतूक कोंडी

मागील पंधरा दिवसांपासून रस्त्याशेजारीच हा मातीचा ढिगारा आहे. यामुळे शहरातून शहापूरच्या दिशेने जाणाऱया वाहनांची कोंडी होत आहे. सायंकाळच्या सुमारास तर या ठिकाणी नेहमीच कोंडी होत आहे. पंधरा दिवस उलटले तरी अद्याप काम पूर्ण न झाल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींची डोळेझाक होत असल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related Stories

लाभार्थी नवीन बीपीएल रेशनकार्डच्या प्रतीक्षेत

Amit Kulkarni

कलाश्रीच्या आठव्या सोडतीच्या मानकरी खानापूरच्या ज्योती देवलतकर

Amit Kulkarni

पोलीस परीक्षांमधील कॉपीचा गोकाक पॅटर्न!

Amit Kulkarni

राजू कागिनकरसह दिवंगत क्रिकेटपटूंना विविध मंडळांकडून श्रद्धांजली

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यकच

Patil_p

विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा

Amit Kulkarni
error: Content is protected !!