Tarun Bharat

‘मातोश्री’च्या नादाला लागू नका

प्रतिनिधी / कोल्हापूर

सामना वृत्तपत्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत मॅचफिक्सिंग होती. त्यांनी इतरत्र मुलाखत देवून दाखवावे, राज्यात एक नव्हे दोन मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. या टिकेचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. मातोश्रीच्या नादाला लागू नका. ‘मातोश्री’वर टीका केली की, त्याचा नारायण राणे होतो. तुमचा राणे होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा क्षीरसागर यांनी भाजप प्रदेध्याक्षांना दिला आहे.

क्षीरसागर यांच्या पुढाकाराने येथील सीपीआर हॉस्पीटलमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक कोटी रूपयांचे बेड आणि कपाटे प्रदान करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीला प्रत्युतर दिले.

क्षीरसागर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व आंबा पडावा, त्या पद्धतीने अचानकपणे मोठे झाले आहे. त्यांना भाजप आणि शिवसेनेत जी तीस वर्षे युती होती, त्या बद्दल फारसे माहित नसावे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो वा पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत. त्यांनी पक्ष हितापेक्षा महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य दिले आहे. तेंव्हा कधीही मातोश्रीतून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाही. जी भूमिका घेतली ती ‘सामना’तून मांडली आहे. ही बाब चंद्रकांत पाटील यांनी समजून घ्यावी. गेली सहा वर्षे प्रसारमाध्यमांना साधी एकही प्रतिक्रिया न देणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दलही आम्ही प्रश्न उपस्थित करू शकतो, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला.

क्षीरसागर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीच्या नादाला लागू नये. कारण मातोश्रीवर टीका केल्यावर त्यांचे काय झाले? हे सर्वांना माहित आहे. चंद्रकांत पाटील यांनीही टीका करताना ध्यानात ठेवावे, अन्यथा त्यांचा राणे होण्यास वेळ लागणार नाही, असेही क्षीरसागर म्हणाले.

Related Stories

खूनाचा बदला घेत आप्पा मांढरेवर गोळीबार

Patil_p

थंडीच्या कडाक्यासोबत पुण्यात ताप, खोकल्याची साथ

datta jadhav

…तर भविष्यात कोणीही न्यायासाठी लढणार नाही : नवनीत राणा

Archana Banage

वळीवडेत आणखी चार पॉझिटिव्ह एकूण संख्या सहावर

Archana Banage

उस्मानाबाद : तरुणीच्या खुनाबद्दल तीघांना जन्मठेप

Archana Banage

कर्नाटक न्यायालय;शैक्षणिक संस्थेत हिजाबबंदी योग्य

Abhijeet Khandekar