Tarun Bharat

माधवबाग कॉलेज रोड क्लिनिकला पुरस्कार

आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स ईन पेशंट केअर एक्सलेन्स यासह पाच पुरस्कारांनी सन्मान

प्रतिनिधी /बेळगाव

माधवबाग-कॉलेज रोड धर्मवीर संभाजी चौक बेळगाव शाखेच्या डॉ. विद्या आर. यांना ‘बेस्ट क्लिनिक ईन ओव्हर ऑल परफॉर्मन्स’ पुरस्काराने यंदा गौरविण्यात आले. प्रतिवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱया या शाखेला या पुरस्कारासह एकूण 5 पुरस्कारांनी यावर्षी सन्मानित करण्यात आले. यात सर्वोत्कृष्ट डॉक्टर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पेशंट केअर एक्झिकुट अवॉर्ड, पंचकर्म थेरपिस्ट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सेवा पुरस्कार आदींचा समावेश आहे.

कॉलेज रोड येथील क्लिनिक मार्फत रुग्णांना पुरविण्यात आलेल्या सेवासुविधा, रुग्णांना बरे करण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांच्या बरे होण्याचे प्रमाण या सर्व बाबींमध्ये अव्वल आल्यामुळे तसेच कोरोनाकाळातही रुग्णांना चांगली आणि तत्पर सेवा दिली. तसेच हे सर्व सांभाळताना रुग्णांच्या मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार त्रासांमध्ये झालेली सुधारणा व रुग्णांचे समाधान, कॉलेज रोड शाखेविषयी असलेला जिव्हाळा या निकषांची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आले.

हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार करण्यासाठी जगातील अग्रगण्य संस्था असणाऱया माधवबागचा यावर्षीचा वार्षिक सन्मान सोहळा नुकताच हुबळी येथे पार पडला. या कार्यक्रमात कर्नाटकमधील माधवबागच्या सर्व शाखांचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.

Related Stories

दिव्यांग राम भक्ताकडून निधी संकलन

Amit Kulkarni

आमच्या हक्कांवर गदा आणणे हे बेकायदेशीर

Patil_p

‘झंकार’ भित्तीपत्रकाचे उद्घाटन

Amit Kulkarni

केएलईच्या कॉलेजना राज्यस्तरीय एनएसएस पुरस्कार

Amit Kulkarni

गणेशोत्सवावरील निर्बंध मागे घ्या, अन्यथा आंदोलन

Amit Kulkarni

लशीसाठी येळ्ळुरात रात्री 3 पासून रांगा

Amit Kulkarni
error: Content is protected !!