Tarun Bharat

मानवी त्वचेवर 9 तासांपर्यंत जिवंत राहतो कोरोना

जपानी वैज्ञानिकांचे सतर्क करणारे संशोधन : घरात प्रवेश केल्यावर हात धुणे आवश्यक

कोरोना विषाणू मानवी त्वचेवर 9 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे प्रयोगशाळेत झालेल्या प्रयोगात सिद्ध झाले आहे. इन्फ्लुएंजाच्या तुलनेत कोरोना विषाणू 4 पट अधिक काळापर्यंत जिवंत राहू शकतो. हा दावा जपानच्या क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनने स्वतःच्या संशोधनात केला आहे.

विषाणू इतका वेळ त्वचेवर कसा जिवंत राहू शकतो, याचा मात्र शोध लागलेला नाही. त्वचेवर विषाणू अधिक काळासाठी राहणे धोक्यात वाढ करणारे आहे. याचमुळे साबणाने हात किमान 20 सेकंदांपर्यंत धुणे आवश्यक असल्याचे संशोधनातून समोर येते.

असे झाले संशोधन

संशोधनासाठी फॉरेन्सिक अटॉप्सीद्वारे मानवी त्वचेचे नमुने घेण्यात आले. त्वचेच्या पेशींना कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएंजाच्या नमुन्यांसोबत मिसळविण्यात आले. त्वचेवर फ्लूचा विषाणू 1.8 तासांपर्यंत जिवंत राहिला. तर कोरोना विषाणू 9 तासांपर्यंत जिवंत राहिल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

20 सेकंदांपर्यंत हात धुणे आवश्यक

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या दिशानिर्देशानुसार 60 ते 95 टक्क्यांपर्यंतचे अल्कोहोलयुक्त सॅनिटायजरने किमान 20 सेकंदांपर्यंत हात सॅनिटाइज केले जावेत. तेव्हाच हाताच्या प्रत्येक हिस्स्यातून कोरोना नष्ट केला जाऊ शकतो. किंवा साबण-पाण्याने हात धुतले जावेत. इन्फ्लुएंजा विषाणूच्या तुलनेत कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावण्याचा धोका अधिक आहे. कोरोनाकाळात हातांच्या स्वच्छतेची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे जपानी वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

..तर 11 तासांपर्यंत जिवंत

संशोधकांनुसार नमुन्यांमध्ये रेस्पिरेट्री टॅक्टमधून प्राप्त करण्यात आलेला म्यूकस टाकण्यात आला असता कोरोना विषाणू 11 तासांपर्यंत जिवंत राहिला आहे त्यांच्यावर हँड सॅनिटायजरचा वापर केला असता 15 सेकंदांच्या आत विषाणू नष्ट झाला आहे. हँड सॅनिटाजयर 80 टक्के अल्कोहोलयुक्त होते.

Related Stories

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख 3 वर्षांनी अमेरिकेच्या दौऱयावर

Patil_p

भारत आणि जपान संरक्षण सहकार्य वाढवणार

Amit Kulkarni

जपानमध्ये सायकल्सचे डम्पयार्ड

Patil_p

संपत्तीची विक्री करणार पाकिस्तान सरकार

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 7 लाखांचा टप्पा

datta jadhav

कोरोना लस : अमेरिका-चीनमध्ये तीव्र स्पर्धा

Patil_p