Tarun Bharat

मानांकनात मिताली राजचे अग्रस्थान कायम

वृत्तसंस्था / दुबई

मंगळवारी आयसीसीने घोषित केलेल्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने आपले अग्रस्थान कायम राखले असून न्यूझीलंडच्या ऍमी सॅटर्थवेटने पहिल्या पाच खेळाडूंत पुन्हा स्थान मिळविले आहे.

वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत मिताली राजने 762 मानांकन गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे तर स्मृती मानधना सातव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या सॅटर्थवेटने पुन्हा या मानांकन यादीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान पटकाविले आहे. इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात सॅटर्थवेटने नाबाद 79 धावा झळकविल्या होत्या. गेल्या आठवडय़ात या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेची सलामीची फलंदाज लिझेली ली हिने मिताली राजसमवेत  संयुक्त अग्रस्थान मिळविले होते. पण आता ली 761 मानांकन गुणांसह दुसऱया स्थानावर घसरली आहे. इंग्लंडची कर्णधार नाईटने अलिकडेच न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात 107 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. या कामगिरीमुळे नाईटने या मानांकन यादीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे. नाईट या मानांकन यादीत सध्या नवव्या स्थानावर आहे,.

महिला वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या झुलन गोस्वामीने चौथे तर फिरकी गोलंदाज पुनम यादवने नववे स्थान मिळविले आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची पेरी पहिल्या स्थानावर असून भारताची दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या सोफी इक्लेस्टोन आणि कॅथरीक ब्रंट यांनी या मानांकन यादीत अनुक्रमे सहावे आणि सातवे स्थान मिळविले आहे. दक्षिण आफ्रिकेची आयाबोंगा खाका आठव्या स्थानावर आहे.

Related Stories

जोकोविचचे ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पुनरागमन

Patil_p

वनडे मालिकेसाठी डु प्लेसिसला विश्रांती

Patil_p

गार्सिया ईस्ट बंगालचे साहायक प्रशिक्षक

Patil_p

कसोटी मानांकनात भारत तिसऱया स्थानी

Amit Kulkarni

आय लीग स्पर्धेतील उर्वरित सामने रद्द?

Patil_p

भारत-नेपाळ मैत्रिपूर्ण लढत आज

Patil_p