Tarun Bharat

मानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरावर दगडफेक

गाव गुंडाची दहशत मोडण्यात पोलीस ही अपयशी ?


धामोड / वार्ताहर

कोतेपैकी मानेवाडी (ता राधानगरी )येथील युवकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला . सदर घटना मुलीने घरच्याना सांगितली म्हणुन संबंधित युवकाने मुलीच्या घरावर दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रकार केला आहे. याबत राधानगरी पोलीसांनी एकाला अटक केली आहे . कुरणेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर नातलगानेच बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच काही तासातच मानेवाडी येथेही विनयभंगाची घटना घडल्याने तुळशी खोऱ्यात एकच खळबळ माजली आहे.

मानेवाडी येथे पिडीत मुलीच्या वडीलांचे किराणा मालाचे दुकान आहे. पप्पु विठ्ठल माने याने दुकानात गोळ्या व चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने संबंधित मुलीचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडा ओरड करताच युवकाने पलायन केले. तर घडल्या प्रसंगामुळे पीडित मुलगी दुकानात बेशुध्द पडली.

त्यानंतर सदर घटना मुलीने आपल्या आई वडीलांना का सांगीतली ? म्हणून संबंधित युवकाने पुन्हा येवुन मुलीच्या घरावर व दुकानावर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुकानाचे नुकसान झाले आहे. राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल होताच संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतरही रात्री उशीरा अज्ञात लोकांनी पुन्हा संबंधित पिडित मुलीच्या वडिलाच्या बंद दुकानावर दगड फेक केल्याची घटना घडली आहे.

सदर घटनेचा राधानगरी पोलीसात गुन्हा नोंद झाला असून पप्पु विठ्ठल माने याला अटक करून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम एच शेख करत आहेत.

गावात गुंडाची दहशत..!

मानेवाडी येथील बहूसंख्य तरुण सेंट्रींग कामगार असून अनेकांच्या हातात पैसा खेळत आहे. परिणामी यातील अनेक तरुण वाम मार्गाला लागले असून यातील आरोपी पप्पू माने यांच्यासह आणखी काही तरुणांची गावात प्रचंड दहशत आहे. आतापर्यंत या गावगुंडानी अनेकांना नाहक त्रास देत वेळोवेळी मारहाण केली आहे. या अगोदर या टोळीचे कारनामे पोलीस स्टेशनपर्यत गेले आहेत. तरी गावातील सदर गुंडाचीं दहशत मोडण्याचे काम पोलिस करणार का ? असा प्रश्न सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.

Related Stories

शाहुवाडी : खुटाळवाडीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील ३५ जणांना केले क्वारंटाईन

Archana Banage

Kolhapur; कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल 95.7 टक्के

Abhijeet Khandekar

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत तेच खरे शिवसैनिक- संजय राउत

Abhijeet Khandekar

कोरोचीत एकाचा अहवाल निगेटिव्ह, आठ जण विलगीकरण केंद्रात दाखल

Archana Banage

खंडणीखोर खान टोळीविरूद्ध मोक्का कारवाई

datta jadhav

कोल्हापूर : राज्य कामगार विमा मंडळाच्या हॅास्पिटलकरीता दहा डॅाक्टरांची नियुक्ती

Archana Banage