Tarun Bharat

माने वहिनी, यड्रावकर यांना किंमत मोजायला लावू

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा इशारा

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी खासदार निवेदिता माने आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेचा विश्वासघात केलेला आहे त्याची जबर किंमत त्यांना या निवडणुकीत मोजावी लागेल असा खणखणीत इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला परिवर्तन पॅनलच्या विजयसाठी तर प्रयत्न करावेत परंतु यड्रावकर, माने वहिनींना जिल्हा बँकेच दार कस बंद होतील यावर विशेष लक्ष द्यावे असे आवाहन पवार यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिवसेनेचा मेळावा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या तोंडातील घास काढून एक बहीण म्हणून माने वहिनींना शिवसेनेत घेऊन संरक्षण दिले. तर मंत्रीपद दिल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी हातात शिवबंधन बांधले. परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या उपकाराची त्यांना विसर पडला आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख यांनी विनंती करूनही त्या काँग्रेस आघाडीच्या वळचणीला गेल्या. यड्रावकर यांनीही तोच कित्ता गिरवला कोण आमच्या सोबत आलं आणि गेलं शिवसेनेला काही फरक पडत नाही मात्र त्यांना त्याची किंमत मोजायला लावू असा इशारा यालेळी दिला.

यावेळी संजय पाटील, संजय जाधव, चंद्रकांत पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पाटील, संदीप कारंडे, सुरेश पोवार, जीवन पाटील, इंद्रजित पाटील, सतीश कुरणे, बाजीराव पाटील, राजू यादव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

…मात्र, फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही : प्रवीण दरेकर

Tousif Mujawar

स्वयंसेवी संस्थांनी ऑनलाईन नूतनीकरण करा

Archana Banage

राजस्थानमध्ये कोरोना बाधिताची संख्या 20 हजार पार

Tousif Mujawar

कर्नाटक हिजाब बंदी : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता

Archana Banage

राज्यात पुराचं संकट त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये ; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Archana Banage

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांनी केली खास पोस्ट, म्हणाले…

Archana Banage