Tarun Bharat

मान्सूनची आगेकूच, मुसळधारेची शक्यता

Advertisements

अंदमान निकोबार बेटे व्यापत मध्य बंगालच्या उपसागरात

पुणे / प्रतिनिधी

 नैत्य मोसमी पावसांनी शनिवारी आगेकूच करीत दक्षिणपश्चिम बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटे व्यापली.

 मान्सून शुक्रवारीच अंदमान बेटांवर दाखल झाला होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, याच्या प्रभावामुळे मान्सूनला गती मिळाली आहे. त्यामुळे मान्सूनने अंदमान बेटांसह अंदमान समुद्र व्यापला आहे. दरम्यान, पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याची तीव्रता रविवारी सकाळपर्यंत वाढणार आहे. उत्तर-उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत असताना या क्षेत्राचे सोमवारी सकाळी ‘यास’ या चक्रीवादळात रुपांतर होईल. या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असून, 26 तारखेला ते उत्तर ओरिसा, पश्चिम बंगाल तसेच बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच्या प्रभावामुळे या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

error: Content is protected !!