Tarun Bharat

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले

हातकणंले,शिरोळ, भुदरगड तालुक्यात तुरळक पाऊस

जिल्ह्यात इतरत्र जोरदार पाऊस

धूळवाफ पेरणीच्या उगवणीसाठी ठरला पोषक

शहराच्या सखल भागास तळ्याचे स्वरूप

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेल्या काही दिवसांतील तीव्र उष्म्यानंतर रविवारी दुपारी वादळी वार्‍यासह जोरदार मान्सुनपूर्व पावसाने जिल्ह्यास झोडपले. कोल्हापूर शहरासह करवीर, आजरा, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. राधानगरी व भुदरगड तालुक्यात काही ठिकाणी मध्यम तर इतरत्र तुरळक पाऊस झाला. हातकणंले व शिरोळ तालुक्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली. खरीप हंगामातील धूळवाफ पेरणीच्या उगवणीसाठी हा पाऊस पोषक ठरला असून पेरणीपूर्व मशागतीसाठी अनूकुल ठरला आहे. मान्सूनच्या आगमनापर्यंत पूर्व मोसमी पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असल्यामुळे खरीपाच्या उर्वरित पेरणीला गती येणार आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिह्यातील उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच होता. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी उष्मा कायम होता. दूपारी 2 नंतर काळे ढग एकत्र जमू लागले आणि अडीचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. शहरातील गांधी मैदानासह लक्ष्मीपुरी व्यापारपेठ, कोषागार कार्यालय परिसर, व्हिनस कॉर्नर चौक आदी सखल भागात पाणी साचल्यामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. जयंती नाल्यासह शहरातील सर्व नाले तुडूंब भरून वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे फेरीवाल्यांची तारांबळ उडाली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पाऊस 8 जूनपासून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी 8 जूनपर्यंत पूर्व मान्सून पाऊस पडणार असल्याचाही अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उर्वरित पेरण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे. शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, राधानगरी आदी तालुक्यात भातरोप करण्याचे प्रमाण जास्त आहे. पावसामुळे भात व नाचना रोप तरवा टाकण्यासाठी गती येणार आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात अद्याप पेरणीपूर्व मशागत सुरु असून येत्या आठवडय़ाभरात पेरणीला गती येणार आहे.

Related Stories

कोल्हापूर : सडोली खालसात कोरोना संशयित रुग्ण

Archana Banage

पत्नीचा निर्घृण खून करणाऱया पतीस जन्मठेप

Patil_p

सातारा : पैशाच्या हव्यासापोटी चार खून, मृतदेह टाकले मार्ली घाटात

Archana Banage

दौलतनगरात शिवेंद्रराजेंच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापणा

Patil_p

गटाराचे काम वाहनचालकाच्या जीवावर

Patil_p

पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी

prashant_c