Tarun Bharat

मान्सून होणार पुन्हा सक्रिय

8 जुलैपासून पावसाचे संकेत

पुणे / प्रतिनिधी

 गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. येत्या 8 एप्रिलपासून दक्षिणेच्या भागात मान्सूनच्या धारा बरसणार असून हळूहळू तो देशभर पसरणार आहे.

 गेले 15 दिवसांहून अधिक काळ मान्सूनमध्ये खंड पडला असून यामुळे शेतीवर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी दुबार पेरण्यांची वेळ आली आहे. उत्तरेच्या अनेक भागात उष्णतेची लाट आलेली आहे. मान्सूनने देशाचा 90 टक्के भाग व्यापला असून, अद्यापही दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणाचा भागात तो पोहोचलेला नाही. पोषक स्थितीअभावी मान्सून रखडलेला आहे. तुरळक पाऊस वगळता मान्सूनने दडी मारल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता मान्सूनला पुन्हा संजीवनी मिळणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

 8 जुलैपासून दक्षिणेच्या भागात मान्सून सक्रिय होणार असून हळूहळू त्याचा प्रभाव वाढणार आहे. पश्चिम किनारपट्टी तसेच लगतचा पूर्वमध्य भारतातही या सुमारास पावसास सुरुवात होणार आहे. याबरोबरच 11 जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र किनारपट्टीच्या लगत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असून, याच्या प्रभावामुळे पूर्वोत्तर भारतात पाऊस राहणार आहे. तसेच याच्या प्रभावामुळे पंजाब, हरियाणा या भागात मान्सून दाखल होईल. यामुळे 10 जुलैच्या आसपासच मान्सून उर्वरित उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच दिल्लीचा भाग व्यापणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वायव्य भारत आणि मध्य भारतात पावसाचा जोर 10 जुलैपासून वाढणार आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 

Related Stories

मतदारयादी-आधार लिंक विरोधी याचिकेवर होणार सुनावणी

Patil_p

वाढे फाटय़ावरील सहा दुकाने आगीत भस्मसात

Patil_p

सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस तणावाखाली; अजित पवारांचा आरोप

datta jadhav

केजरीवालांना खलिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका

Patil_p

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Archana Banage

अकरावी प्रवेशाबाबत पुन्हा अचानक तपासणी

Patil_p