Tarun Bharat

माफी न मागण्यावर प्रशांत भूषण ठाम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

न्यायालयाच्या अवमान प्रकरणात ज्ये÷ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दर्शवला आहे. मी यापूर्वी व्यक्त केलेल्या मतावर ठाम असून आताही त्या मतावर कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माझे विधान सद्भावनापूर्ण होते. न्यायालयासमोर मी माझे म्हणणे मागे घेतल्यास माझ्या नजरेतूनच माझा विवेक आणि ज्या संस्थेवर माझा सर्वोच्च विश्वास आहे तिचा अवमान होईल, असे त्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.

न्यायाधीशांविरुद्ध केलेल्या ट्विटबद्दल अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी आपले उत्तर सादर केले. सर्वोच्च न्यायालय हा मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आशेचा शेवटचा बालेकिल्ला आहे. मी केलेले ट्विट माझ्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करते आणि आपले विधान मागे घेणे ही एक नि÷ाहीन माफी असेल, असा दावा त्यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्ये÷ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या अवमानाच्या ट्विटबाबत माफी न मागणाऱया विधानावर पुनर्विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 24 ऑगस्टला संपल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन सर्वोच्च न्यायालयाला सादर केले. आता न्यायालय कोणता निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.

न्यायाधीशांबाबत ट्विटरवर केलेल्या विधानासाठी सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट रोजी त्यांना दोषी ठरवले होते. प्रशांत भूषण यांनी 27 जून रोजी न्यायपालिकेच्या सहा वर्षांच्या कामकाजावर भाष्य केले होते, तर 22 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि चार माजी मुख्य न्यायाधीशांबद्दल आणखी एक विधान केले होते.

Related Stories

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; पुढील उपचार दिल्लीतील एम्समध्ये

Tousif Mujawar

विजेचा धक्का बसून 3 जवानांचा मृत्यू

Patil_p

ब्लॅक टॉप पोस्टवर भारताचा कब्जा

datta jadhav

देशात 50,357 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

देश दुःखी, तरी थांबणार नाही

Patil_p

पंजाब : कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 839 वर

Tousif Mujawar