Tarun Bharat

मामि अध्यक्षपदाचा दीपिकाने दिला राजीनामा

Advertisements

अभिनेत्री दीपिका पदूकोनने मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (मामि) फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अभिनेत्रीने सोमवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. स्वतःच्या कामामुळे या फेस्टिव्हलवर अधिक लक्ष देऊ शकत नसल्याचे कारण तिने दिले आहे. 2019 मध्ये आमिर खानची पत्नी किरण रावच्या जागी दीपिकाची मामि अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

मामिच्या संचालक मंडळावर येणे आणि अध्यक्षपदी सेवा देणे अत्यंत समृद्ध अनुभव राहिला. एक कलाकार म्हणून जगभरातील चित्रपट अणि गुणवत्ता मुंबईत आणणे अत्यंत उत्साहजनक राहिले. माझ्या सद्यकाळातील कामांमुळे मी मामिवर अधिक लक्ष देऊ शकत नाही. अकॅडमीसोबत माझे संबंध जीवनभर राहतील असे दीपिकाने म्हटले आहे.

दीपिका ‘83’ या चित्रपटातून झळकणार आहे. 1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर निर्मित या चित्रपटात दीपिका कपिल देवच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. कबीर खान याच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट 4 जून रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दीपिका पुढील आठवडय़ापासून शाहरुख खान आणि जॉन अब्राहम हे कलाकार असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे. तर रोहित शेट्टींच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘सर्कस’मध्येही ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Related Stories

सर्जरीसाठी अनेकांनी दिले सल्ले

Patil_p

ध्वनि भानुशाली करणार अभिनयात पदार्पण

Amit Kulkarni

‘जामताडा 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Amit Kulkarni

कंगनानंतर मनीष मल्होत्राच्या ऑफिसलाही BMC कडून नोटीस

Tousif Mujawar

सुधीर मुनगंटीवार अडाणी आणि अशिक्षित आहेत – सोनम कपूर

Abhijeet Khandekar

‘मेरी ख्रिसमस’च्या चित्रिकरणात कॅटरिना सामील

Patil_p
error: Content is protected !!