Tarun Bharat

मायकल लोबो समर्थकांसह काँग्रेसमध्ये

दिगंबर कामत यांच्याकडून जोरदार स्वागत भाजप पराभवासाठीच काँग्रेसमध्ये : लोबो

प्रतिनिधी /पणजी

भाजपला रामराम ठोकलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांनी पत्नी डिलायलासह कळंगूट, शिवोली मतदारसंघातील अनेक सदस्य, पंच यांना घेऊन काँग्रेस प्रवेश केल्यामुळे बार्देशमधील राजकारणास वेगळे वळण मिळाले आहे. काँग्रेस पक्षाला या विधानसभा निवडणुकीत 22 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी खात्री लोबो यांनी प्रकट केली. गोवा राज्यातील जनतेने एकमताने काँग्रेस पक्षाला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस निवडणुकीनंतर सरकार स्थापन करेल, असा आत्मविश्वास त्यांनी वर्तविला. गोवा राज्याला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी आणि गोमंतकातील जनतेच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे गोवा निवडणूक निरीक्षक दिनेश गुंडू राव, एम. के. शेख व इतर नेते उपस्थित होते. त्यांनी लोबो, त्यांची पत्नी व इतर सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

लोबोंमुळे काँग्रेस बळकट

दिगंबर कामत यांनी लोबो आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत करताना सांगितले की, जनता काँग्रेससोबत असून भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये, असे लोकांना वाटते. मायकल, त्यांची पत्नी डिलायला आणि समर्थकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय याक्षणी अगदी योग्य आहे. गोव्याची परिस्थिती बदलेल आणि मी आशावादी आहे की काँग्रेस सत्तेवर येईल. लोबो यांच्या प्रवेशाने काँग्रेस बळकट झाला आहे.   जे नेते टीएमसीमध्ये सामील झाले आहेत ते पक्ष सोडतील.

सोनिया, राहुल गांधींचे आभार

पक्ष प्रवेशानंतर मायकल लोबो यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानले. आम्ही गोव्याच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गरीब लोक त्रस्त आहेत. त्यांचा आवाज ऐकायला कोणीच नाही. लोक पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होत आहेत कारण त्यांना माहीत आहे की योग्य दिशेने जायचे असेल तर काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे, असे ते म्हणाले.

कामतांचे गोव्यासाठी सर्वोत्तम योगदान

दिगंबर कामत त्यांनी गोव्यासाठी सर्वोत्तम योगदान दिले असल्याने त्यांच्यासोबत काम करणे खूप चांगला अनुभव देईल. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी 22 पेक्षा जास्त जागा जिंकू. लोकांना स्थिर सरकारसाठी मतदान करावे लागेल, असे लोबो म्हणाले. डिलायला लोबो यांनीही काँग्रेस नेत्यांचे आभार मानत शिवोली मतदारसंघात इतिहास घडवणार असल्याचे सांगितले.

काँग्रेस मजबूत होणार

दिनेश गुंडू राव म्हणाले की, लोबो यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे. लोबो सामान्य माणसाशी जोडला गेला आहे. त्यांच्या मतदारसंघात आणि परिसरात त्यांचे चांगले नाते आहे. यामुळे काँग्रेस मजबूत होण्यास मदत होईल. भाजप सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याने लोक बदलासाठी मतदान करणार.’’ असे ते म्हणाले.

Related Stories

डिचोली तालुक्मयात शनिवारी 57 कोरोना रूग्ण सापडले

Patil_p

राजेश फळदेसाई यांची वाहनसेवा ठरली मोठा आधार

Patil_p

जलवाहिनी फुटून मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी

Omkar B

मांद्रे वाणिज्य महाविद्यालय प्राचार्यपदी तुषार अणवेकर

Amit Kulkarni

कुडचडेत आणखी 8 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी

Amit Kulkarni

डॉ. देश प्रभुदेसाई यांच्यावर मित्र परिवाराचा निवडणूक न लढविण्यासाठी दबाव

Omkar B