Tarun Bharat

मायटी सिक्सर्सकडे जीपीएल चषक

Advertisements

विशाल गौरगोंडा मालिकावीर, सामनावीर पुरस्काराचा मानकरी

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

जितो प्रिमियर लीग चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मायटी सिक्सर्स संघाने शीतल रामशेट्टी संघाचा 8 धावानी  पराभव करून जीपीएल चषक पटकाविला. विशाल गौरगोंडाला मालिकावीर व सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात मायटी सिक्सर्स संघाने अदिती पीएमपी संघाचा 23 धावानी तर दुसऱया उपांत्य सामन्यात शीतल रामशेट्टी संघाने जैन ऍवेंजर्स संघाचा 7 गडय़ानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मायटी सिक्सर्स संघाने 14 षटकात 4 बाद 157 धावा केल्या. कर्णधार विशाल गौरगोंडाने 3 षटकार, 5 चौकारासह 68, अनुप जी ने 37, अक्षय पत्रावळीने 30 धावा केल्या. शीतल रामशेट्टीतर्फे राहुलने 2, अप्पय्या व सचिन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल शीतल रामशेट्टी संघाने 14 षटकात 6 बाद 149 धावाच केल्या. सचिन सतगौडाने 3 षटकार, 2 चौकारासह 50, सचिन कुडचीने 15 धावा केल्या. मायटी सिक्सर्सतर्फे भुषण यल्लमण्णावरने 29 धावात 4 गडी बाद केले. बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे राजु बोस, सतिश मेहता, सुनिल कपाडिया, अंकित खोडा, विक्रम जैन, मल्लाप्पा पल्लेद, बसवराज चरंतीमठ, नितिन पोरवाल, शांतीलाल पोरवाल, विनयकुमार बालिकाई, दीपक सुभेदार, अरूण शहा, शिल्पा हजारे, पुष्कर जक्कण्णावर यांच्या हस्ते विजेत्या मायटी सिक्सर्स व उपविजेत्या शीतल रामशेट्टी यांना रोख रक्कम, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज अक्षय पत्रावळी, अंतिम सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर ही बक्षिसे विशाल गौरगोंडाने पटकाविली. स्पर्धेसाठी पंच म्हणून नंदकुमार मलतवाडकर, आनंद कुंभार, हेमंत यादव तर स्कोअरर म्हणून लिमेश जैन, प्रसाद सुगुर यांनी काम पाहिले. प्रमोद जपे व अनिल कुडतुडकर यांनी समालोचन केले.

Related Stories

सोमवारी दिलासा, मात्र 984 अहवालांची अद्याप प्रतीक्षा

Patil_p

डिफेन्स कॉलनीत रस्ताकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

कोरोना लस, ब्लॅक फंगसच्या औषधांबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Rohan_P

पाणी शुद्धीकरण यंत्रात बिघाड नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

Patil_p

उत्तर बेळगावला केवळ एकच सेक्शन ऑफिसर

Patil_p

हंगरगा हायस्कूलसाठी कूपनलिकेची खोदाई

Omkar B
error: Content is protected !!