मायलेज 35.60 किमी पर्यंत राहणार असल्याचा कंपनीचा दावा
मायलेज 35.60 किमी पर्यंत राहणार असल्याचा कंपनीचा दावा
नवी दिल्ली
देशातील दिग्गज वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने सीएनजी मॉडेल कार्स 10 लाख इतक्या विक्री करत नवा विक्रम नोंदविला आहे. या टप्प्यावर पोहोचलेली ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. यामध्ये मारुती, आल्टो, एस-प्रेसो, वेगनार, सेलेरियो, डिझायर, अर्टिगा, ईको, सुपर कॅरी आणि टूर एस आदींना सीएनजी मॉडेलमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
मारुतीने 2010 ते 11 मध्ये 15,900 सीएनजी कार युनिटची विक्री केली होती. 2016 ते 17 मध्ये हा आकडा 3.5 लाख युनिट होता. परंतु हाच प्रवास 2021-22 च्या दरम्यान पाहिल्यास 10 लाख युनिटवर पोहोचल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
सेफ्टी फिचर्सवर अधिकचे लक्ष…
माइक्रोस्विच हा वाहन बंद असल्यावर व इंधन भरताना बंद राहतो
सीएनजी फिलर फिल्टर सीएनजी सिस्टमला गंज व धूळीपासून संरक्षण करते
पेट्रोल मोडमध्ये स्टार्ट केल्यास इंजिनचे चांगल्याप्रकारे लुब्रिकेशन होते.
एरेना व नेक्सासोबत नवे मॉडेल आणण्याची तयारी