Tarun Bharat

‘मारुती’ची कार खरेदी होणार आणखीन सोपी

मुंबई 

 सध्या मारुतीची कार घेणं होणार आहे आणखीन सोपे कारण कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा सुरु केली आहे. मारुती सुझुकी कंपनीने आता ऑनलाईन कर्जाचा विस्तार आणखीन वाढविला आहे. एरेना गाडी खरेदी करण्यास या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. प्रारंभीच्या काळात सदरची सुविधा देशातील प्रमुख 30 शहरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असून आगामी काळात या सेवेचा विस्तार वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासाठी कंपनीने 12 बँकांसोबत भागीदारी केल्याची माहिती आहे.

देशातील दिग्ग्ज कंपनी

कार निर्मितीमधील दिग्गज कंपनी म्हणून मारुती सुझुकीची ओळख आहे. हीच कंपनी आता आपल्या ग्राहकांसाठी नवीन मार्ग उपलब्ध करुन देत असल्याने ग्राहकांना कार घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत व्यक्त होत आहेत.

या बँकासोबत भागीदारी

मारुतीने ग्राहकांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, महिंद्रा फायनान्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बँक ऑफ बडोदा, चोलामंडलम फायनान्स, कोटक महिंद्रा प्राईम, ऍक्सिस बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, येस बँक आदींसोबत कंपनीने करार केल्याची माहिती आहे.

Related Stories

एस ऍण्ड पी ग्लोबल करणार आयएचएसचे अधिग्रहण

Patil_p

मोटोरोला फोल्डेबल 5 जी फोन सादर करण्याच्या तयारीत

Patil_p

देशातील मक्क्याची निर्यात 28 टक्के वाढली

Patil_p

वीज वितरण कंपन्यांवरील थकबाकी 35 टक्के वाढली

Patil_p

सेन्सेक्समधील तेजीला अखेर विराम!

Patil_p

कोल इंडियाकडून वीज क्षेत्राला 173.4 लाख टन कोळशाचा पुरवठा

Patil_p