Tarun Bharat

मारुतीच्या कार्स तिसऱयांदा महागल्या

नवी दिल्ली

मारुती सुझुकी कंपनीने आपल्या स्वीफ्टसह सीएनजीवर आधारित मोटारींच्या किमती 15 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला सदरची दरवाढ करावी लागते आहे. सदरची वाढ ही सोमवार दि. 12 जुलैपासून अंमलात येत असून ही वाढ तिसऱयांदा करण्यात आली आहे. इतर कार मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा विचार केला जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. स्वीफ्टची दिल्लीतील किंमत 5.73 लाख ते 8.27 लाख रुपये तर सीएनजीवरील आल्टो, सेलेरियो, एसप्रेसो, वॅगनआर, इको व अर्टिगा यांची किंमत 4.43 लाख ते 9.36 लाख रुपये इतकी आहे.

Related Stories

सणासुदीत प्रवासी वाहन विक्री तेजीत

Patil_p

हिरो इलेक्ट्रिककडून 20 हजार जणांना प्रशिक्षण

Patil_p

टीव्हीएस, होंडाकडून नव्या दुचाकी सादर

Patil_p

होंडा मोटारसायकल्सवर सवलत

Patil_p

महिंद्रा डिझेल एक्सयुव्ही-500 बाजारात

Patil_p

मारुतीकडून सीएनजी कार्सची विक्री 3 लाखांवर

Patil_p