Tarun Bharat

मार्केट यार्डात भाजीपाल्याचे भाव कोसळले

वार्ताहर/ काकती

एपीएमसी मार्केट यार्डात भाजीपाल्याचे भाव कोसळल्याने थेट टेम्पोतून आणलेली मेथी व कोथिंबीरची विक्री करण्यात येत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.

मार्केट यार्डात भाजीपाल्याचे भाव कोसळले असल्याने गोकाक परिसरातील भाजीपाला गेले आठ दिवस थेट ग्राहकांना विक्री करण्यात येत आहे. मेथी भाजी दहा रुपयाला दोन मोठय़ा पेंढय़ा कोथिंबीर मोठय़ा पेंढय़ा दोन दहा रुपयात विकण्यात येत आहेत. परिणामी ग्राहकांची चंगळ झाली असून मेथीची मोठी एक पेंढी पुरेशी होत आहे. तर काही ठिकाणी तीन पेंढय़ाही विक्री करण्यात येत आहेत. गोकाक, यमकनमर्डी परिसरात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला घेण्यात आला आहे.

येथील स्थानिक भाजीपाला येत्या रब्बी व उन्हाळी हंगामात येणार आहे. तेव्हा मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन वाढणार आहे. परिणामी असे भाव कोसळले तर उत्पादक शेतकऱयांनी चरीतार्थ कसा चालवायचा अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

Related Stories

शिवरायांचे आचार, विचार आत्मसात करा

Amit Kulkarni

उचगावात 12 तर तुरमुरीत 5 जण पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

आयशर ट्रकची ऊस ट्रॉलीला धडक, एक गंभीर

Patil_p

परिवहनचा ‘बस डे’ उपक्रम बंदच

Amit Kulkarni

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती

Patil_p

विकासावरच ग्रामीण भागाचे भवितव्य अवलंबून

Omkar B