Tarun Bharat

मार्चमध्ये देशातील खाद्य तेलाची आयात घटली

32.44 टक्क्मयांच्या घसरणीसह 9 लाख 41 हजार 219 टनावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील खाद्य तेलाची आयात मार्च 2020 मध्ये 32.44 टक्क्मयांनी घटून 9 लाख 41 हजार 219 टनावर राहिला आहे. साल्वेंट ऍक्स्ट्रटर्स असोसिएशन (एसइए) यांनी विदेशी बाजारांतील रिफायनरी पाम तेलाच्या खरेदीवर सरकारी प्रतिबंध लावले आहेत. यामुळे आयातीत घसरण नेंदवण्यात आली आहे. भारत जगात वनस्पती तेलांची खरेदी करणारा मुख्य देश आहे.

मागील वर्षात मार्चमध्ये देशात 13 लाख 93 हजार 255 टन तेलाची आयात करण्यात आली आहे. देशाच्या एकूण वनस्पती तेलाच्या आयातीत पामतेलाचा हिस्सा 60 टक्क्मयांहून अधिक आहे. एसईए यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षातील मार्चमध्ये आरबीडी पामोलीनची आयात 90 टक्क्मयांनी घटून 30,850 टनाच्या घरात पोहोचली आहे. एक वर्षांच्या अगोदर मार्चमध्येच हीच आयात तीन लाख 12 हजार 673 टन झाली होती.

एसईएने सांगितल्याप्रमाणे कच्च्या पाम तेलाची आयात (सीपीओ) आणि कच्चे पामतेल कर्नेल(सीपीकेओ) आयात मार्चमध्ये 38 टक्कय़ांनी घटून तीन लाख 4 हजार 458 टनावर राहिली आहे. जी एक वर्षापूर्वी याच महिन्यात चार लाख 89 हजार 770 टन होती. आकडेच्यानुसार मार्च महिन्यात सोयाबीन तेलाची आयात हालक्मया प्रमाणात घटून दोन लाख 92 हजार 410 टनावर राहिली आहे. सुर्यफूलाच्या तेलाची आयात मात्र दोन लाख 97 हजार 887 टनावरुन घटून 2 लाख 96 हजार 501 टनावर राहिली आहे. 2019-20च्या नेंव्हेबर ते मार्चमध्ये खाद्यतेलाची एकूण आयात 10 टक्क्मयांनी घटून 53 लाख 91 हजार 807 टन राहिली आहे.

आरबीडीचे प्रतिबंध

रिफायन्री, ब्लीच्ड, डियोडराइज्ड (आरबीडी) यांच्या प्रतिबंधीत सूचीच्या माहितीनुसार पामोलीनचे आयात आठ जानेवारीपासून व्यापारात मोठी घसरण झाली आहे. पाम तेलास प्रतिबंध शेणीत टाकणे म्हणजे तेलाची आयात करण्यासाठी सरकारकडून परवाना घेण्याची आवश्यक असते. त्याशिवाय तेलाची आयात करता येत नाही.

Related Stories

ऑक्टोबरमध्ये बँकिंगसह अन्य नियमात बदल

Patil_p

एसीएमइ-आयएचआय यांच्यामध्ये करार

Patil_p

दुसऱया दिवशीही बाजारात घसरणच

Patil_p

बँकींग-आयटीच्या कामगिरीने बाजार सावरला

Patil_p

ई-कॉमर्स क्षेत्रात मजबूत तेजीचे संकेत

Amit Kulkarni

होंडा थांबवणार नोएडातील उत्पादन

Omkar B