मालवण/प्रतिनिधी-
‘जय भवानी, जय शिवाजी…. हर हर महादेव’च्या जयघोषात भगवे झेंडे फडकावित भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पेहेरावात शिवजयंतीनिमित्त शहरात काढलेली शिवज्योत मिरवणूक लक्षवेधी ठरली. शिवज्योत मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीवर साकारलेल्या चित्ररथाचे सर्वांनी कौतुक केले.

