Tarun Bharat

मालवणात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

प्रतिनिधी / मालवण:

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुरुवारी मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने राज्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने जिल्हय़ासाठी त्यातील 1 रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेविका दर्शना कासवकर, नगरसेवक पंकज सादये, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, किसन मांजरेकर, नंदू गवंडी, किरण वाळके, भाई कासवकर, प्रसाद आडवनकर, राजू मेस्त्राr, दीपा शिंदे, बाळू नाटेकर, विद्या फर्नांडिस, नीलम शिंदे, महेश मेस्त्राr, बंडय़ा सरमळकर, पप्या लुईस, स्वप्नील आचरेकर, आतू फर्नांडिस, चंदू खोबरेकर, अक्षय भोसले, अनंत पाटकर, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करून हा कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी रुग्णवाहिकेत ऑक्सिजन युनिटसाठी पन्नास हजार रुपयांचे योगदान जाहीर केले. दरम्यान, रुग्णवाहिक उपलब्धतेबाबत उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर (9403242404) या नंबरवर संपर्क साधावा. अशी माहिती देण्यात आली.

 जयवंत परब यांना श्रद्धांजली

 मसुरे गावचे सुपुत्र, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत महादेव परब (70) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्यावतीने मालवण शिवसेना शाखा येथे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. e}},{“fls-eu.amazon.in:443”:{“supports_spdy”:true}},{“loadus.exelator.com:443”:{“supports_spdy”:true}},{“images-eu.ssl

Related Stories

गोव्यातील खासगी बसेसना सिंधुदुर्गात प्रवेश द्या!

NIKHIL_N

रत्नागिरी रिफायनरी नागपुरात हलणार?

Patil_p

गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त

Tousif Mujawar

दोडामार्गच्या श्रुती गवस ची अमेरिकेतील एव्हरी डेनिसन फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड

Anuja Kudatarkar

चिपळुणात देशी-विदेशी दारुसाठा जप्त

Patil_p

अनिल परब यांना अंतरिम जामीन मंजूर

Patil_p