Tarun Bharat

मालवण गाबित समाजतर्फे गुणवंतांचा १७ जुलै रोजी सत्कार

मालवण/प्रतिनिधी-

दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ १७ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी दिली.

मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची सभा मंगळवारी गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था कार्यालयात पार पडली. यावेळी उपाध्यक्षा चारुशीला आचरेकर, खजिनदार मिथुन मालंडकर, सहसचिव गंगाराम आडकर, पूजा सरकारे, भाऊ मोरजे, दादा वाघ, राधिका कुबल, दिक्षा ढोके आदी उपस्थित होते. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण गाबित विद्यार्थ्यांनी दादा वाघ 9422584004 श्री सिद्धीविनायक ट्रॕव्हल्स-मालवण बस स्टँडसमोर यांच्याकडे आपले नाव आणि गुणपत्रकाची साक्षांकित प्रत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील कोरोना प्रादुर्भावामुळे प्रलंबित राहिलेल्या गुणवंत गाबित विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

Related Stories

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत

Anuja Kudatarkar

‘रॉयल कॉर्नर’ आगीत बेचिराख

Patil_p

घरपट्टी विरोधाचा ठराव सहा महिन्यापूर्वीच

NIKHIL_N

नियमांतील अटींमुळे जलतरण तलाव अद्याप बंदच

Patil_p

मालवणात शासकीय फार्मसी कॉलेज सुरू करा!

NIKHIL_N

रत्नागिरी पॉलिटेक्निकचे होणार अद्ययावतीकरण

Patil_p