Tarun Bharat

मालवण दूरध्वनी कार्यालयात अधिकारी घेतात स्वत:ला कोंडून

टेलिफोन बिल भरण्याचेच काऊंटर सुरू

प्रतिनिधी / मालवण:

मालवण तालुक्यात दूरध्वनीबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्याच्यादृष्टीने येथील दूरध्वनी कार्यालयात जाणाऱया ग्राहकांना बीएसएनएलचे अधिकारी भेटतच नाहीत. कोरोनाच्या धास्तीमुळे भरदिवसा कार्यालयात कोंडून घेऊन ते बाहेरील दरवाजाला कुलूप लावून घेत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. फक्त टेलिफोन बिल भरण्याचे काऊंटर सुरू ठेवल्याने ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या अधिकाऱयांनी कार्यालयात कोंडून न घेता ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण न केल्यास मनसे कोणत्याही क्षणी आंदोलनाचा पवित्रा घेईल आणि होणाऱया नुकसानीस अधिकारी वर्ग जबाबदार राहील, असा इशारा मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव व माजी मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिला आहे.

कोरोना संकट कालावधीत शासनाच्या निर्णयानुसार सरकारी कार्यालये सुरू ठेवणे आवश्यक असून मालवण बीएसएनएल कार्यालयात मात्र ‘आंधळ दळतंय नि कुत्रं पीठ खातंय’ असा प्रकार सुरू आहे. बीएसएनएल ग्राहकांना भेटण्यापेक्षा कोरोनाच्या धास्तीमुळे काही अधिकारी दिवसाढवळ्य़ा कार्यालयात कोंडून बाहेरून कुलूप लावून घेण्याचा प्रकार संतापजनक आहे. शहरातील मोबाइल टॉवरची यंत्रणा जुनी झाली आहे. अनेकवेळा हे टॉवर बंद पडतात. टॉवर बंद पडत असल्याने अवलंबून असणाऱया अन्य खासगी कंपन्या दंड आकारत आहेत. म्हणजेच जनतेच्या खिशातूनच बीएसएनएलमधील अधिकारी इतर खासगी कंपन्यांकडे बंद टॉवरसाठी दंड भरत आहेत. मोबाईल टॉवरसाठी आवश्यक असलेला जनरेटर चालविण्यासाठी कामगारच नसल्याची माहिती मनसेकडे आहे, असे सांडव व इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

ऑनलाईन बिल भरणा सुरू केली असली, तरी लँडलाईन सेवेचाही बोजवारा उडाला आहे. अनेक बंद नादुरुस्त लँडलाईन टेलिफोन अपुऱया कर्मचाऱयांमुळे बंद आहेत. म्हणूनच बीएसएनएलने ऑनलाईन बिल भरणा जरुर सुरू ठेवावा पण ग्राहकांना आधी सुविधा द्यावी, अशी मागणीही सांडव, इब्रामपूरकर यांनी केली आहे

Related Stories

बांदा केंद्रशाळेत चैतन्यमय वातावरणात शाळेचा पहिला दिवस

NIKHIL_N

विधवा प्रथा बंदसाठी आचरा ग्रामस्थांचा एल्गार

Anuja Kudatarkar

महामार्ग चौपदरीकरणासाठी आता सहा ठिकाणी ‘चक्काजाम’

Patil_p

महाडमध्ये एसटी चालकाचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

Patil_p

बांधकाम विभागात 4 कोटींचा घोटाळा

Patil_p

आषाढी एकादशीनिमित्त दांडी येथे भव्यदिंडी

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!